रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर) सिंदेवाही तालुका अध्यक्ष पदी सुनिल विठ्ठल गेडाम लाडबोरी यांची निवड

16

✒️सिंदेवाही(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिंदेवाही(दि 15ऑगस्ट):-राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे व डॉ. मोहनलाल पाटील राष्ट्रीय महासचिव यांच्या मार्गदर्शनातून सौ प्रिया खाडे विदर्भ अध्यक्ष यांच्या नेतृत्त्वात सिंदेवाही तालुका अध्यक्ष पदी लाडबोरी येथील पत्रकार सुनिल विठ्ठल गेडाम यांची निवड करण्यात आली आहे हि संघटना तालुक्यातील जनतेला न्याय, हक्क व त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल व संघटनेच्या माध्यमातून पक्ष वाढविण्याचे काम करून वंचित समाजास न्याय मिळवून देण्यासाठी काम करू आणि संघटनेमध्ये कार्य करताना समाजात वावरताना एकोपा निर्माण करुन सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्या विश्वासाला कोणत्याच तडा जाऊन मतभेद होणार नाही.वरिष्ठांचा विश्र्वास संपादन करुनच पाऊले उचलली जातील,पक्ष वाढविण्यास सुरवात करून तळागाळापर्यंत नेऊ असा आशावाद नियुक्ती प्रसंगी बोलून दाखवला.
सुनिल गेडाम यांच्या नियुक्तीच्या शुभेच्छा श्री अरुण माधेशवार पत्रकार गुंजेवाही, निलेश तराळे पत्रकार पळस गाव (जाट), लाडबोरी येथील रमेशजी धोंगडे, मारोती नागदेवते, आकाश कामडी, प्रकाश नागदेवते, मधुकर कारमेंगे यांनी केले