स्वातंत्र दिनाच्या” शुभपर्वावर प्रसिद्ध गायमुख देवस्थान, बाळापूर येथे राबविले स्वच्छता अभियान

24

▪️ विर शिवाजी युवा मित्र मंडळ, मेंडकी मार्फत विशेष उपक्रम

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.15ऑगस्ट):-१५ ऑगस्ट २०२० स्वातंत्र दिनाचे शुभपर्व साधून शहरातील, गावखेळयातील खुप मित्र मंडळी वेगवेगळ्या निसर्ग पर्यटन स्थळाला भेटी देत असतात.अश्यातच कोणत्याही विशेष पर्यटनाला भेटी दरम्यान खूप लोक जेवण व नास्ताच्या कार्यक्रमांचे आयोजन पण करीत करतात. त्यामुळे अशा सर्वच पर्यटनस्थळी खुप मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होतो. व आपण अश्या बाबींकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतो. मग त्या दुर्गंधीमूळे बिमारी होण्याचे संकेत असतात. याच गोष्टीची बाब लक्षात घेता, ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी या गावातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेला “वीर शिवाजी युवा मित्र मंडळ” यांनी मेंडकी ते तळोधी या मार्गावरील प्रसिद्ध गायमुख देवस्थानाच्या परिसरात आज पर्यटकांनी केलेला घनकचरा व प्लास्टिक गोळा करून, संपूर्ण देवस्थान परिसर स्वच्छ करून काढला, व तिथेच त्यांनी यावर्षीचा आज आगळा वेगळा स्वातंत्र्य दिन साजरा केला.

मेंडकी येथे मागील दोन वर्षापासून या गावातील काही तरुणांनी मिळून बनविलेला सामाजिक कार्यमंडळ, यांमार्फत तेथील तरुणांनी स्वच्छतेचे व्रत अंगीकारून, एक नवा ध्यास स्वीकारला आहे. व याच तरूनांमार्फत आज एक नवीन उपक्रम राबविण्यात आले..
आज झालेल्या विशेष कार्यामध्ये वीर शिवाजी युवा मित्र मंडळ, मेंडकीचे भूषण आंबोरकर, प्रशांत खोब्रागडे, शुभम महाडोरे, अंकुश कोसरे सर, खेमचंद वसाके, शुभम करंडे, ओमप्रकाश जेंगठे, प्रतीक चवारे, कृणाल जांभूळे, गणेश वाडई, शिवम हर्षे, मंगेश विधाते, मंगेश गावतुरे, नयन कायरकर, निखिल कायरकर, आकाश गुरणुले इत्यादी सभासद यावेळी उपस्थित होते.