जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोणी व्यंकनाथ येथील पारधी वस्तीला दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हे नाव

9

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.16ऑगस्ट):-ग्रामीण विकास केंद्र व लोकाधिकार आंदोलन या संस्था व संघटनेचा जागतिक आदिवासी दिवस हा आनंदोत्सवाचा सण संयुक्त विद्यमाने साजरा केला जातो. या सणादिवशी शाहू, फुले व आंबेडकर यांचे विचार प्रत्येक हाडामासाचा कार्यकर्ता मनात व मस्तकात स्वीकारून ते विचार ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजात पेरत असतानाच लोणी व्यंकनाथ येथील पारधी वस्तीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हे नाव देण्यात आले आहे.

कारण, या गायरान जमिनीत राहणाऱ्या मुलांनी खूप हलाकीच्या परिस्थितीत डिग्री, डिप्लोमा व दहावी बारावी चे शिक्षण पूर्ण केले आहे. आजही शिक्षणाचा प्रश्न या वस्तीसमोर आहे. अशा या वस्तीला हेच नाव देण्याचा आग्रह संस्थेचे संस्थापक अॅड.डाॅ.अरुण जाधव व संचालक बापू ओहोळ व समन्वयक सचिन भिंगारदिवे आणि सागर भाकरे यांनी केला आणि आज वस्तीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हे एक परिवर्तनवादी व सामाजिक चळवळीतील अग्रेसर नाव दिले गेले आहे.

संतोष भोसले यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, लोणी व्यंकनाथ येथील शाहूनगर येथे जागतिक आदिवासी दिवस शासकीय नियमांचे पालन करुन साजरा करण्यात आला आहे. यावेळी आदिवासी समाजासाठी असणाऱ्या शासकीय योजना, आदिवासी संस्कृती व समस्या आणि या समस्या वर सर्वांना मिळून काय उपाययोजना करता येतील ? या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच, आदिवासी समाज या देशाचा मूळ मालक असून, त्याला गुलामगिरीतच आजही जीवन जगावे लागत आहे. त्यांचा अशिक्षितपणा, गरिबी, आरोग्य विषयी समस्या, खोटी गुन्हेगारी, मूलभूत अधिकारावर गदा यामुळे आदिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच पूर्वीपासूनच अशिक्षित असलेला आदिवासी समाज कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहात येत असतानाच सरकारने ऑनलाइन शिक्षण सुरू केल्यामुळे मोबाइल, इंटरनेट, लाईट, लॅपटॉप, या सुविधांची कमतरता तसेच परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पहिल्या काळातील अशिक्षितपणाचा पाढा रिपीट होईल की काय? अशी भीती आदिवासी समाजातील सुज्ञ नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी आदिवासी समाजाच्या वतीने भोसले यांनी स्थनिक प्रशासनाला विनंती केली आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे समन्वयक सचिन भिंगारदिवे व सागर भांगरे, रोहिणी राऊत, लता सावंत, छाया भोसले (ग्रामपंचायत सदस्य), ज्योती भोसले व राहुल गोरखे, संतोष भोसले, सारिका गुंड, तसेच आसाराम काळे, बाटक्या काळे, विलास काळे, शरद काळे, शिलाबाई भोसले, बाजीराव काळे, तुळसाबाई काळे, टाबर भोसले, दिवान भोसले, लैलंग भोसले, प्रवीण काळे, दत्ता गोरखे, राजू भोसले, प्रसाद भोसले तसेच आदिवासी भिल्ल व पारधी समाज बांधव उपस्थित होते. अशी माहिती लोकाधिकार आंदोलनाचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

स्रोत:(संतोष भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती