🔹मुख्य बाजारात शिरले पाणी

✒️संतोष संगीडवार(आलापल्ली,प्रतिनिधी)

मो:-7972265275

आलापल्ली(दि.16ऑगस्ट):-भामरागड परिसरात मागिल 3 दिवसापासून सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे पर्लकोटा नदी ला आलेला दाबा मुळे भामरागड चा सम्पर्क तूटलेला आहे.अखेर रात्रीपासुन पुलावर पाणी चढलेले आहे व भामरागड येथे मुख्य बाजारपेठ मध्ये पूर्णपणे पाणी शिरलले असुन नागरिकांना सुरक्षितस्थळी आसरा घेण्याचे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आलेला आहे.

   मागील 4 ते 5 दिवसापासून सतत पावसाची झळ सुरु आहे. 3 दिवसापासून पर्लकोटा नदी च्या पाण्याची पातळीत प्रचंड वाढ झाली असून रात्रीपासून पुलावर पाणी चढले व मध्यरात्री बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरवात झाली, त्यामूळे व्यापाऱ्यांनी आपले नुकसान होऊ नये म्हणून आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यात सुरवात केली व पहाटेच पाणी गावात शिरल्यामुळे नागरिकानी ही आपल्या गडबडीत आप आपले साहित्य घेउन सुरक्षित स्थळी गेले व महसूल विभाग,पोलिस विभाग आणि नगरपंचायत प्रशाशन पहाटेपासूनच नागरिकांना सतर्क करीत पुर परिस्थितीवर लक्ष ठेउन आहेत. मागिल वर्षी सुध्दा भामरागड ला पुराचा जोरदार फटका बसला होता अनेक दिवस पाण्याखाली घरे होती,अनेकांचे घर उध्वस्त झाले होते रस्ते नाल्या वाहुन गेले, अनेक जनावरे म्रुत्युमुखी पडले होते त्यावेळी पोलिस प्रशासन अनेक नागरिकांचा जीव वाचविला होता यामुळे यावर्षी प्रशासन नागरिकांची काळजी घेतली असुन शाशकिय यंत्रणा सुद्धा तयार ठेवण्यात आले.

◆ गेल्या तीन चार दिवसापासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा भामरागड तहसील जगाच्या संपर्का बाहेर झाला आहे. पावसामुळे भामरागड च्या बस स्टॅंड चौकापर्यंत पुराचे पाणी शिरले असून नदीच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने रहदारी बंद झाली आहे.

◆ नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Breaking News, पर्यावरण, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED