

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405
परळी वैजनाथ(दि.16ऑगस्ट):-परळी शहरात कोरणा वाढता प्रादुर्भावमुळे ,१७,१८,व १९, ऑगस्ट रोजी चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी कामगार कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॅन्टीजन तपासणी करण्यात येणार आहे परळीच्या प्रशासनाने शहरात अॅन्टीजन तपासणीसाठी तपासणी केंद्र निर्माण केले आहेत नटराज रंग मंदिर बस स्थानक श्री सरस्वती विधालय या केंद्रात दि १७, १८, व १९ , ऑगस्ट रोजी सकाळी 8, ते सायंकाळी 5, वाजे पर्यत अॅन्टीजन तपासणी करण्यात येणार आहे तर चौथे केंद्र दि१७, ऑगस्ट रोजी सावता माळी मंदिर जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर दि १८, ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालय व दि १९, रोजी शारदा नगर येथील विधावर्धिनी विधालयात सकाळी, 8, ते सायंकाळी ,5, वाजे पर्यत अॅन्टीजन तपासणी केंद्र उपलब्ध करण्यात आले असल्याचे प्राशासनाने कळवले आहे, परळी शाहरातील व्यापारी ,कामगार अदी नागरिकांनी अॅन्टीजन तपासणी करुन घ्यावी असे आवाहन प्राशासनाने केले आहे.