घाटनांद्रा ग्रामपंचायतीला प्रहार संघटनेच्या वतीने अपंगाच्या विविध समस्यांसंदर्भात जाहीर उपोषणाचा इशारा

28

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.16ऑगस्ट):-घाटनांद्रा ग्रामपंचायतीला माननीय आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेले सिल्लोड प्रहार तालुका अध्यक्ष श्री.हरी प्रताप गिरी यांच्या वतीने अपंगांच्या विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतीचे वतीने ग्रामसेवक मुकने साहेब, सरपंच लताबाई चंदनशिवे यांनी निवेदन यावेळी स्वीकारले. आदर निवेदनात संघटनेच्या अपंगांचा 2013 पासून हे आज पर्यंत चौदाव्या तसेच ग्रामनिधीतून असलेल्या पाच ते तीन टक्के निधी तत्काळ अपंगाच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात यावा.तसेच ग्रामपंचायत मालकीचे असलेले गाळेत अपंगांना प्राधान्य देण्यात यावी,तसेच covid-19 या महा अपत्तीच्या कार्यकाळात स्थानिक अपंगाना राशन किट तसेच आरोग्य तिकीट तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी,तसेच सदर ग्रामपंचायतच्या वतीने गावातील अपंगाचा सर्वे करून अंत्योदय योजने अंतर्गत अपंगांना अंत्योदय योजनेचे राशन कार्ड साठी ग्रामपंचायतीने ताबडतोब पाठपुरावा करावा.

प्रहार संघटनेच्या वतीने दर स्थानिक आपण त्यांच्या समस्यांचे निराकरण सादर ग्रामपंचायतीने केले नसेल तर येत्या सात दिवसात ग्रामपंचायती समोर आमरण उपोषणा संदर्भात लोकशाही पद्धतीने आमरण उपोषण करण्यात येईल.याठिकाणी उतरलेल्या परिस्थितीस सादर ग्रामपंचायतीचे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.अशा आशयाचे निवेदन संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री.हरी प्रताप गिरी तसेच स्थानिक पदाधिकारी,अनिस पाशू (मिस्तरी)पठाण,श्रावण नाना मोरे,अलीम माजित पठाण,रामू रेवनाथ जोशी,पोपट कडुबा मोरे, सुनिता भाऊसाहेब पठाडे, कामिका विलास मोरे,सलीम कलिम पठाण,संजय भगवान पंडित,हिरोज रियाज शेख, करुणाबाई दगडू मोरे,धनराज कडुबा मोरे,जयवंताबाई भास्कर शिंदे,सजद अजीम पठाण,गुड्डू इद्रिस बातोक,श्रावण सुखदेव मालोदे,मुखतार उस्मान सय्यद, नसरीन लिहाखतखान पठाण,असेफ बाबू पटेल यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.