दिव्यांग (मुखबधीर) मुलीचा आंतरजातीय विवाहाला अनेकांचे सहकार्य

20

🔸आमदार संजय जगताप यांनी केले कन्यादान

🔹शंभूराजे युवा प्रतिष्ठान पुरंदर दहीहंडी उसत्व,सासवड यांनी दिली संसार उपयोगी भांड्यांची भेट

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

पुणे(16ऑगस्ट):-चि.सौ.कां.पूनम (श्री.सुरेश किसन पोळ, जेजुरी यांची जेष्ठ कन्या ,मुकबधिर, कर्णबधिर) व चि.भरत (श्री.नानासो यशवंत जराड रा. वडगाव रासाई यांचे द्वितीय चिरंजीव,अपंग नाही ) यांचा शुभविवाह जेजुरी सांस्कृतिक कार्यालय याठिकाणी संपन्न झाला. विशेष म्हणजे चि.सौ.कां.पूनम ही दिव्यांग (मुकबधीर) असून तिची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड करत आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी चि.भरत याने स्वीकारली व संपूर्ण जराड परिवाराने तिचे लक्ष्मीच्या रूपाने स्वागत केले हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

 या विवाहसोहळ्यामध्ये कन्यादान मा.आमदार संजयजी जगताप यांनी केले. यासारख्या पवित्र कार्याचा मान पोळ कुटूंबियांनी मला दिला हे मी माझे सौभाग्य समजतो. सदर विवाह सोहळा हा आंतरजातीयदेखील होता वधू-वरांना संसार उपयोगी भांडी शंभुराजे युवा प्रतिष्ठान पुरंदर दहीहंडी उत्सव सासवड यांनी कोरोनामुळ दहीहंडी उत्सव रद्द झाल्याने सामाजिक बांधिलकी जोपासत भांडी भेट दिली. ज्यामुळे जाती धर्माच्या भिंतीपलीकडे जाऊन मानवी मूल्यांची जपवणूक करत या दोन्ही परिवारानी या निमित्ताने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

समाजामध्ये जगत असताना समाजाच्या चौकटीपलीकडे जाऊन एक वेगळी रुजवात निर्माण करण्याच धारिष्ट्य फार कमी व्यक्तींमध्ये असतं आणि एखाद्याने असं धैर्य दाखवलं तरी त्याला कुटुंबाची साथ मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. या सर्व संघर्षावर मात करत आज हे दोन्ही कुटुंब एकत्र आले व हा आनंदाचा महापर्व संपन्न झाला जो सदैव स्मरणात राहील…. हा विवाहसोहळा घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्याप्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी मध्यस्थी करून हा दोन कुटुंबांना एकत्र आणले विवाह संपन्न होत असताना कायद्याच्या चौकटीत जाऊन कोर्ट मॅरेज करण्यात आले नंतर वधुवरांना शुभेच्छा चे प्रमाणपत्र माननीय आमदार संजय जगताप सर यांच्या हस्ते देण्यात आले मा.नामदार राज्य मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी फोन वरून वधूवरांना शुभेच्छा दिल्या तिरंगा हाती देऊन राष्ट्रगीताने विवाहाची सुरुवात करण्यात आली वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी पीडीसी बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे सर पुरंदर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप अण्णा पोमण, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अध्यक्ष गणेश जगताप, नगराध्यक्षा वीनाताई सोनवणे, सासवड पोलिस स्टेशनचे घुगे साहेब, नगरसेविका ,रुक्मिणी जगताप, बाळासो दरेकर, अतुल शिर्के, कल्पना गुरव , शिवाजी शिंदे उपस्थित होते.

नवदाम्पत्यास त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क च्या वतीने मनस्वी शुभेच्छा !