🔸श्रावणाच ऊन मला झेपेना,पिवळा रंगाचा पक्षी नाव सांगेना

✒️नितीन राजे(खटाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव/जिल्हा सातारा(दि.17ऑगस्ट):-कायमस्वरूपी दुष्काळाचा ठपका घेऊन जगत आलेल्या खटाव तालुक्यात जून महिन्यापासूनच पावसाला चांगली सुरुवात झाली. खरिपाची पिके जोमात येऊन शेतकरी सुखावला असला तरी, रब्बी हंगाम एवढ्या पावसावर होणार नाही हे माहीत असल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षेत खटाव तालुका आहे. सातारा जिल्ह्यात आज वर 866 मी मी पाऊस पडला आहे तर खटाव तालुक्यात 366 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.आता याच दुष्काळी भागातील उजाड माळरानावर श्रावण सरी मुळे रंगीबेरंगी फुलांची जणू उधळण झाली असूनआणि फुलपाखरे मुक्तसंचार करत असल्याने वनस्पती व फुलपाखरू प्रेमी साठी ही नवीन परवणीच आहे.
ना. धो. महानोर यांची एक होता विदूषक मधील लावणी *श्रावणाच ऊन मला झेपेना ,पिवळा रंगाचा पक्षी नाव सांगेना* अशी अवस्था जणू वनस्पती आणि फुलपाखरू प्रेमींची झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील जागतिक पर्यटन केंद्र म्हणून कास पठाराची ओळख निर्माण झालेली आहे. याच भागात दुष्काळी खटाव माण तालुके देखील आहेत आता श्रावणात पडणाऱ्या पावसामुळे माळरानी लाल, गुलाबी, पिवळी ,हजारो प्रकारची रानफुले पावसात चिंब होऊन मनसोक्त डूलत आहेत. अगदी काही फुले तर नजरेला देखील पडत नाहीत इतकी छोटी असून, त्यांचा आकार बदामाच्या प्रमाणे अगदी जिवंत फुलपाखरू असल्याप्रमाणे आहेत. मग याचा आनंद घेण्यासाठी फुलपाखरे कशी मागे राहतील अनेक प्रकारची फुलपाखरे देखील या माळरानावर मुक्त संचार करताना दिसत आहेत यातच एक मोर पंख असलेला फुलपाखरू आढळून आले. जनू मोरपंख खरच या फुलपाखराच्या अंगावर चिटकलेल्या सारखे दिसत असून अतिशय वेगळ्या प्रकारचे हे फुलपाखरू दिसत होते .परंतु ही फुले, फुलपाखरे कोणत्या जाती व प्रजाती ची आहेत हे माहीत नसल्यामुळे वनस्पतीशास्त्रातील तज्ञांचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील फुल,आणि फुलपाखरे प्रेमींना आवश्यक आहे. अजुन येत्या काही दिवस फुले व फुलपाखराचा आनंद अजूनहि द्विगुणित होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पर्यावरण, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED