✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.17ऑगस्ट):-काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची आज सकाळी दोन अज्ञात तरुणांनी कुऱ्हाडीचे सपासप वार करून हत्या केली. ऊसरे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने नागपूर हादरून गेले आहे.

देवा ऊसरे हे गड्डीगोदाम येथे राहतात. ते चौकाताली चहा टपरीवर येऊन बसायचे. आजही ते नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर फिरण्यासाठी आले होते. नेहमीप्रमाणे चहाच्या टपरीवर आले होते. यावेळी त्यांनी टपरी शेजारच्या रुग्णालयाजवळ दुचाकी लावली आणि मागे वळत नाही तोच दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ऊसरे भांबावून गेले. कुऱ्हाडीचे जोरदार घाव बसल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. ऊसरे यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून नंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ऊसरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

ऊसरे हे काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गड्डीगोदाम प्रभागाचे त्यांनी मनपात प्रतिनिधीत्व केले. त्यांनी पहिल्यांदा त्यांनी माजी महापौर राजेश तांबे यांचा पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा काँग्रेसकडून विजयी झाले. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे चहा टपरीवर बसले होते. ही टपरीच ऊसरे त्यांचे जनसंपर्क कार्यालयासारखे होते. ५४ वर्ष वयाचे ऊसरे यांना पहलवान म्हणून ओळखले जायचे. हत्येनंतर त्यांचा मृतदे शवविच्छेदनासाठी मेयो रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

क्राईम खबर , खान्देश, नागपूर, राजकारण, राजनीति, विदर्भ, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED