✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.17ऑगस्ट):-दूधाचे दर घसरल्याने उत्पादकांचा खर्चही वसूल होत नाही.दूध दर वाढ करण्यासाठी अनेकदा आंदोलन, मागण्या करूनही दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय धोक्यात आला असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात ७०ते८०% लोक शेती करतात शेती व्यवसाय सतत घाट्याचा ठरत असल्याने जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यास शेतकरी पसंती देतात. मात्र, सध्या दुधाचे दर प्रति लिटर १८ ते २० रुपये असा नीचांकी भाव मिळत असल्याने दूध व्यवसाय करणे अवघड बनले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या तर दुध उत्पादन खर्च भरून निघणे देखील कठीण झाले असून ‘दूध स्वस्त, पाणी महाग’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दुग्ध व्यवसाय टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात जेमतेम पाण्यावर जनावरांना खाण्यासाठी घास, हिरवे गवत, मका आदी चारा तयार करीत आहेत. यासाठी खर्च करूनही दूधाचे दर जैसे थेच आहेत. दूध वाढीसाठी अनेक प्रकारची औषधे, ढेप, सरकीसारख्या खाद्यवस्तू खरेदी करावी लागतात. ढेपच्या शंभर किलो पोत्याच्या दर सध्या चोवीशे ते पंचवीशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एका गायीला ढेपचे एक पोते साधारण पंधरा ते वीस दिवस जाते. त्यात गायीचा दवाखाना व इतर खर्च विचारात घेता दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे.
शेतकऱ्यांना कृषीप्रधान देशात त्यांच्या दूधापेक्षा पाण्याला जास्त भाव भेटेत आहे त्यामुळे​शेतकऱ्यांना मध्ये निराशेचे वातावरण निर्माण होत आहे.

आध्यात्मिक, नांदेड, महाराष्ट्र, रोजगार, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED