

▪️पोळा सणानिमित्त विशेष लेख▪️
पोळा किंवा बैल पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. या सणासाठी शेतकर्यांमध्ये उत्साह असते. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात व तेथील शेतकऱ्यात या सणाला विशेष महत्व आहे. श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी ,नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणाला बरोबर सर त्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात बैल पोळा साजरा केला जातो. सर्जा-राजाचा सण म्हणजे पोळा.
या दिवशी बैलांचा थाट असतो. त्यांना कामापासुन आराम असतो. तुतारी वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. कोणाला त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन त्यांची आंघोळ घालण्यात येत, नंतर चारुन घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्याला “खाद शेकणे” अथवा “खांड शेकणे” म्हणतात. त्याच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल(पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरू चे ठिपके, शिंगाना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या,(एक प्रकारचा शृंगार), गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा कडदोडयाचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या “बैल करी” घरगडयास नवीन कपडे देण्यात येतात. नंतर संपूर्ण गावामध्ये नाचत गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते. आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळील एक मोठेआंब्याचे पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यावे “झडत्या”(पोळ यांची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर मानववाईक यांच्यातर्फे तोरण तोडले जाते, व पोळा फुटतो. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणाऱ्यास “बोजारा”(पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे. पोळ्यास “बैलपोळा “असे देखील म्हणतात.
या दिवशी बैलांना पूर्ण दिवस आराम दिले जाते. त्यांना पूर्ण दिवसासाठी कोणती काम करू दिले जात नाही. बैलपोळ्याच्या दिवशी घरी पुरणपोळी, करंजी, व इतरही गोड पदार्थ बनवले जातात. शेतकर्याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्याची वाट पाहत असतात.तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते.घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात.
बैल पोळ्याच्या दुसर्या दिवसापासून शेताची नांगरणी केली जाते. बियांची पेरणी केली जाते. ज्यांच्याकडे बैल नाही ते लोक मातीचे बैल बनवून त्यांची पूजा करतात.
अशाप्रकारे बैलपोळा हा सर्जा राजाचा सणआहे. पण यावर्षी हा पोळा सण कोरोनामुळे स्वप्नवत झाला आहे. या महामारी मुळे यंदा हा सण घरीच साजरा करायचा आहे.
✒️सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया.
तालुका समन्वयक अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.
८००७६६४०३९