🔸आज (दि.17ऑगस्ट) सकाळची घटना

🔹आपतग्रस्त कुटूंबियांना जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या कडून आर्थिक मदतीचा हात

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.17ऑगस्ट):-तालुक्यातील गांगलवाडी येथील दिनांक 17 ऑगस्टला सकाळच्या सुमारास सिलिंडरच्या स्फोटात घर जळून राख झाल्याची घटना घडली.
गांगलवाडी येथील रुपेश दिघोरे यांच्या घरी सकाळी आठच्या सुमारास चहा बनवत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने या स्फोटात संपूर्ण घर जळून राख झाले. त्यात सुदैवाने कुणालाच काही झाले नाही मात्र रुपेश दिघोरे यांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे.

झालेल्या स्फोटात संपूर्ण घर जळाले असून अन्नधान्य पैसा, कपडे, घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असल्याने कुटुंब संपूर्णता उघड्यावर पडले आहे.यांची माहिती त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांना मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेऊन आर्थिक मदत केली. तलाठी यांनी स्थळपंचनामा करण्यात आले. शासनाने त्वरित मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.यावेळी ज्ञानेश्वर भोयर संरपच, नामदेव मेश्राम, पांडुरंग भोयर,नलेश भोयर पोलिस पाटील, विनोद पाटील,यु.वी.बाटवे तलाठी,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED