गेवराई तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवा

13

🔹रयत शेतकरी संघटनेने सादर केले निवेदन

✒️गेवराई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गेवराई(दि.17ऑगस्ट):-तालुक्यातील शेतकरी व सामान्य जनतेचा मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्याकरिता रयत शेतकरी संघटनेचा वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना गेवराई तहसीलदार यांचे मार्फतीने निवेदन पाठविण्यात आले आहे.

या निवेदनात तालुक्यातील निराधार लोकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावा, अपत्रा लाभार्थी रद्द करा, दोषींवर गुन्हे दाखल करा,खताचा काळा बाजार थांबून रास्त दरात खते मिळाली पाहिजे,सरकारने बंदी घालण्यात आलेल्या कीटक नाशक औषधी शासन जमा करून शेतकरी बांधवांना मोफत देण्यात यावे,बियाणे न उगवल्याने शेतकरी बांधवाना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई मिळावी,दीव्यांग बांधवांना पस्तीस किलो धान्य व राशन किट तात्काळ घरपोच द्या अमल बजावणी न करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात यावी तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर सर्व कुटुंबाला किराणा साहित्य वाटप करण्यात यावे अनेक योजनेचे पैसे शिल्लक असून ते वापरण्यात यावे,तालुक्यातील प्रशासकीय झालेल्या बदली अधिकारी सेवामुक्त करण्यात यावे,राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी कोरोना काळात मंत्री मंडळ यांच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोना रुग्ण जागेवर स्थानबद्ध न केल्यामुळे सामान्य माणसाला होणारा त्रास थांबवा.

दोन्हीही सरकार कर्ज माफीचा डांगोरा करत असून अनेक वर्षांच्या छोट्या व अनेक कर्जदाराला कर्ज माफी न देता फसवणूक थांबवा व सरसकट सगळ्या शेतकरी बांधवांना सातबारा कोरा करून पीक कर्ज तत्काळ वाटप करून शेतीसाठी विविध कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे,तालुक्यातील राशन दिशाभूल करू नका प्रत्येक गोडाऊन मधील कुठल्याही पाच दुकानं जाहीर वाटप जनतेसमोर करण्यात येऊन संबधित राशन दुकान कायमचे निलंबित करण्यात यावे,या सर्व मागण्याचे निवेदन रयत शेतकरी संघटना वतीने तालुका प्रमुख बाबुराव भोईटे निवेदन देऊन आठ दिवसाच्या आत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही तहसील कार्यालयात मुक्काम मोर्चा करून गोंधळ सुरू करू याला सर्वस्वी जबाबदार तहसील प्रशासन राहील.आदी मागण्यांचा समावेश आहे.

    निवेदन सादर करतांना बाबूराव भोईटे,सचिन शहागडकर ,सुनील ठोसर, जयश्री वेल्हाळ उपस्थित होते.