चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1121 — 24 तासात 16 बाधित

35

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.17ऑगस्ट):- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1121 झाली आहे. गेल्या 24 तासात 16 नवीन बाधित पुढे आले असून 31 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 749 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 361 बाधित उपचार घेत आहे. आतापर्यंत 749 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 9 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मात्र यापैकी बहुतांशी बाधित हे अन्य आजाराने त्रस्त होते.

आज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील 8 जणांचा सहभाग आहे. यामध्ये बालाजी वार्ड, जटपुरा गेट, पंचशील चौक, सितलामाता परिसरातील बाधितांचा समावेश असून बहुतेक संपर्कातून व श्वसनाच्या आजारातून पुढे आलेले बाधित आहेत. नागरिकांनी परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर पाठोपाठ राजुरा तालुक्यातील तीन बाधितांच्या समावेश आहे. यामध्ये टेंभुरवाही व अमराई वार्ड, बहाडे प्लॉट येथील बाधितांचा समावेश आहे.

भद्रावती तालुक्यातील हनुमान वार्ड येथील 2 बाधित तर सुमठाणा येथील एक बाधित अशा एकूण 3 जणांचा सहभाग आहे. संपर्कातून हे बाधित पुढे आले आहे. तर मुल येथील एका बाधिताचा समावेश आहे. भेजगाव येथील हा बाधित संपर्कातून पुढे आला आहे.


🔺गडचिरोली जिल्हयात आज 31 कोरोनामुक्त तर 20 नविन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.17ऑगस्ट):-जिल्हयात आज 31 जण कोरोनामुक्त झाले असून यामध्ये अहेरी येथील एसआरपीएफ हेडरीचे -14, स्थानिक-3, वडसा येथील 12 सीआरपीएफ जवान, धानोरा येथील 1 स्थानिक व मुलचेरा येथील 1 स्थानिक असे एकूण 31 जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना आज दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 20 नविन कोरोना बाधित आढळुन आले आहेत. त्यापैकी 16 आरमोरी येथील असून 2 स्टाफ नर्स, 1 डॉक्टर, 1 पीएसआय, 1 गरोदर महिला असून बाकीचे संस्थात्मक विलगीकरणातील रुग्णांच्या संपर्कात आलेले तीव्र जोखमीचे आहेत. तर 3 कोरोना पॉझिटिव्ह हे कोरचीचे असून 2 मुंबईहुन आलेले तर 1 जण तामिळनाडु येथून आलेला होता. गडचिरोली येथील 1 पोलीस बाधित असून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला असून आज एकूण 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 140 झाली असून एकुण बाधित संख्या 843 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 702 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.