✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.18ऑगस्ट):-कोरोना महामारी दरम्यान आपल्या प्राणाची पर्वा न करता लोकांसाठी निस्वार्थपणे दिवसरात्र काम करीत असल्याबद्द्ल आम आदमी पार्टी तर्फे चिमूर विधानसभेत प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा व पोलिसांचा सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.

७४ व्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून कोरोना महामारी दरम्यान दिवसरात्र काम करीत असणाऱ्या आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आम आदमी पार्टी विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. देवेन्द्र वानखेडे, चंन्द्रपूर जिल्हा-अध्यक्ष श्री सुनील मुसळे यांच्या मार्गदर्शनात, प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर विधानसभेतील चिमूर, नेरी, शंकरपूर, भिसी, तळोधि, नागभीड येथील आरोग्य अधिकारी-कर्मचारी, आशा, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या निस्वार्थ सेवेसाठी व कर्तव्यदक्ष तत्पर्तेसाठी सन्मानपत्र देवून आभार प्रगट करण्यात येत आहे.

या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आम आदमी पार्टी चे सुरेशजी कोल्हे, आदित्य पिसे, मंगेश शेंडे, मंगेश वांढरे, त्रिलोक बघमारे, विशाल इंदोरकर, नरेश बुटके, संजय बहादुरे, सुशांत इंदोरकर, विशाल बारस्कर, लोकेश बन्डे, शिगॉल पाटील, लीलाधार लिचडे, संतोष इखार, व इतर सर्व पदाधिकारी तसेच स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED