दारूत पाण्याची भेसळ

  54

  ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  नागपूर(दि.18ऑगस्ट):-सिलबंद दारूच्या बाटतीतून दारू काढून त्यात पाणी मिसळून विकणाऱ्या टोळीला नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले.

  उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चौघांना याप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ८३ हजार ६३० रुपयांचा विदेशी दारूचा साठा आणि टाटा एस वाहन असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठोक विक्रेत्यांकडून वाहतूक परवाना आणि मद्य घेऊन वितरणासाठी जाताना वाटेत विदेशी दारूचे टोकन काढून त्यात पाणी मिसळत होते. त्यानंतर कुणाच्या लक्षातही येणार नाही असे ते टोकन पुन्हा लावण्यात येत होते. बनावट दारू बनविणाऱ्या आकाश मेश्राम, सिद्धू साहू आणि भूषण लोणारकर, विकी इरणकर यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार कारवाई करण्यात आली. अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शना त निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक प्रशांत युरपुडे, सोनाली खांडेकर यांनी ही कारवाई केली.

  जप्त केलेला साठा

  विदेशी दारू : १८० मिलिलिटरच्या १४४० बाटल्या

  विदेशी दारू : ७५० मिलिलिटरच्या ६० बाटल्या

  विदेशी दारू : ०१ लिटरच्या १२ बाटल्या