अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा अहमदनगर जिल्हा कार्यकर्ता मेळावा व पदग्रहण कार्यक्रम संपन्न

18

✒️आदेश उबाळे(विशेष प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.18ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे यांनी अत्याचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पदग्रहण समारंभ संपन्न झाला त्यावेळी समिती मधील काम करणारे सर्व धर्मीय समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ते अन्याय-अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र दादा जाधव ह्या समारंभांच्या अध्यक्ष खाली होते.
समारंभाचे प्रास्ताविक समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ रमाबाई धीवर यांनी केले.
त्यावेळी एखाद्या समाजातील व्यक्ती वर अन्याय झाल्यास अन्याय-अत्याचार सिमिती ची भूमिका काय असेल हे कार्यकर्त्यांना समजून सांगून समितीच्या हिताचे अनेक विषयावर साधक बाधक सविस्तर चर्चा करण्यात आली
यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय वजीर शेख उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय वसंतराव वाघ उपमहाराष्ट्र कोषाध्यक्ष माननीय जसपाल सिंग टिकू भाई कोहली नाशिक जिल्हा सरचिटणीस मनीषा
म्ह सदे नाशिक जिल्हा संघटक प्रदीप पगारे मा .शीला जाधव, मा रेखा जाधव यांनी आपले विचार मांडून सदर शिबीरास मार्गदर्शन केले सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये मार्ग मागासवर्गीय समाजबांधावर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार व उपेक्षा होत आहे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अन्य अत्याचार निर्मूलन समिती सदन शीर मार्गाने लढत असून कुठल्याही जातीधर्मातील अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी समितीचे पदाधिकारी लोकशाही व सनदशीर मार्गाने अखेरपर्यंत लढत राहणार असल्याने रवींद्र दादा जाधव यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा जिल्हाध्यक्ष निखिल भोसले, माननीय संजय गिरी, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष सौ रमादेवी धीवर मॅडम, सौ वंदना म्हसे, स शकुंतला तांबे ,उपाध्यक्ष किरण जाधव,शोभा पातारे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मंजाबापू लकडे शेवगाव तालुका अध्यक्ष जा नमोहम्मद शेख, माननीय हमराज सय्यद राहाता व शिर्डी तालुक्यातील युवक समितीने विशेष प्रयत्न घेतले अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही बैठक पार पडली समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा जाधव यांच्या हस्ते नवीन नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आले
*स्रोत (उपाध्यक्ष किरण जाधव यांच्या (पत्रकार )माहितीनुसार)*