देगलूर तालुक्यात शेतकरी वाहुन गेलेली दुबार घटना

8

🔺20 जुलै ला हाणेगाव येथील घटनेत हाणमंत गोरे वाहून गेला
तर 17 ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे टाकळी ( जा ) येथील शेतकरी संध्याकाळी घराकडे येत असतांना वाहून गेला.

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.18ऑगस्ट):-मरखेल परिसरात दि. (17) रोजी संध्याकाळी पडलेल्या मुसधार पाऊसामुळे नदी नाल्ये तुडुंब भरुन वाहत होत्या.टाकळी (जा) येथील रामदास मलगोंडा मलगीरे वय ( 55 ) याची शेती चेंडेगाव तेलंगाणा शिवारात आहे, शेतात संध्याकाळ पर्यंत फवारणी करुन येत असतांना पाऊसाला सुरवात झाली बगता बगता नदी नाल्ये वाहू लागले सतत पडत असलेला पाऊस कमी होत नाही अंदाजा घेऊन घराकडे येत असतांना झरी,चेंडेगाव फाटा जवळ नदी पार करताना पाण्याचा जोर असल्याने वाहून गेला.
रात्री घराकडे वडील आले नाहीत म्हणून रात्री 8 वाजता शोधण्यासाठी, मुलगा नागनाथ, भाऊ बालाजी चुलता हानमंत व गावातील काही नागरीकासह शोध घेण्यासाठी शेताच्या वाटेने रात्री,3 वाजे पर्यंत शोध घेतले असता शोध लागले नाही.
पुन्हा सकाळी त्याच वाटेने शोधत असतांना चेंडेगाच्या फुला जवळ बाभळीच्या झुडपात रामदास याच मयत देह आढळला.घडलेली घटना मरखेल पोलिस ठाणे व तहसील येथे कळविण्यात आले,तलाठी, अंबुरे व पोलिस उपनिरीक्षक अजित बिरादार, पोलीस शिपाईसह घटनास्थळी पोहचले, घटना तेलंगणा येथे घडल्याने पो.उप.बिरादार यांनी पुढील कार्यवाही तेंलगना पोलिसांना सापवीले. जरी मयत वेक्ती महाराष्ट्र राज्य येथील असून घटना तेंलगना राज्य सिमेवर चेंडेगाव येथे घडल्याने, तेलंगना येथील पोलिस हेड,कॉन्स्टेबल पि.सायन्ना,परमेश्वर, हेमाद्री, यांनी घटनास्थळी पोहचून मयत बॉडीस ताब्यात घेतले असून PM साठी भांसवाडा येथे पाठवण्यात आले.पुढील तपास तेलंगणा पोलीस करत आहेत.