चिमुर तालुक्यातील सावरी (बीड.) येथे पोलिसांवर अवैध दारू विक्रेत्यांचा हल्ला

47

🔸शेगाव (बु) पोलिसांना मारले लाथा बुक्यांनी  – एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

शेगाव (बु) -(पुरोगामी संदेश नेटवर्क)

शेगाव (बु)-(दि.18ऑगस्ट):-पोलीस ठाणे शेगाव अंतर्गत येत असलेल्या चिमुर तालुक्यातील सावरी बिडकर येथे अवैध दारू विक्रेत्यांनी पोलीस पथकावर हल्ला करून लाथा बुक्यांनी मारहाण केली.यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्या मुळे उपजिल्हा रुग्णालय  वरोरा येथे हलविण्यात आले आहे.

 शेगाव बु पोलिस स्टेशन हद्दित येत असलेल्या सावरी येथे आज (दि.18ऑगस्ट) येथील पोलिसावर हल्ला झाल्याचे प्रकरण उघड़किस आले आहे .

 मौजा सावरी येथे अनेक दिवसा पासून  उपजिल्हाधिठवरे हा इसम अवैधरित्या दारू विक्री करीत असून पोळयाच्या शुभ मुहूर्तवर दारू तस्कर प्रकाश ठवरे यांनी अवैध दारू साठा आपल्या राहते घरी जमा केला असल्याची गुप्त माहिती मिळताच येथील ठानेदार श्री सुधीर बोरकुटे यांनी आपल्या शिपाई सह या घराची झडती घेत असता पोलिस पथक यांच्या वर आरोपी नामे संदीप ठवरे , सतीराम ठवरे , प्रवीण ठवरे , शुभम ठवरे राहणार सावरी , व मंगेश जुमड़े यांनी अमानुषपणे पोलिसावर हात बुकक्या सह मारहाण केली.

यात a s i श्री अशोक शिरसागर जखमी झाले, यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे भरती करण्यात आले. शिवाय काही पोलिस कर्मचारी यांच्यावर सुद्धा हल्ला बोल केला. असून यांच्या सुद्धा खाकी वर्दीवर डाग लावण्याचा जनतेचे रक्षक असलेले पोलिस यांच्यावर जर हल्ला होत असेल तर सर्व सामान्य जनतेचे काय होईल ? असा सवाल सर्व जनतेसह सामाजिक संघटना करु लागली आहे. खाकी वर्दितल्या पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपी वर कठोर करवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.