बोङखा ग्रामपंचायत येथे कचरु आठवलेच्या उपोषणाला यश विविध मागण्या होणार पुर्ण

30

✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.18ऑगस्ट):-जालना जिल्ह्यातील घनसावांगी तालुक्यातील बोङखा येथील कचरू आठवले यानी ग्रामपंचायत कार्यालय समोर आज उपोषण केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी जाधव यांचा लेखीआश्वासनांने उपोषण मागे घेण्यात आले कचरु आठवले मुळे 14 वित्आयोगातुन दिव्यागं व्यक्तीना पाच टक्के निधी वाटप तसेच दलीत वस्ती सिंमेट रस्ता कामासंदर्भात चौकशी आदी मागण्या लवकरच पुर्ण करणार असे लेखी पञ देण्यात आले आहे.

सविस्तर असे की जालना जिल्ह्यातील घनसावांगी तालुक्यातील बोङखा ग्रामपंचायत च्या समोर दि 13 / 8 / 2020 रोजी ग्रामस्थ कचरु आठवले हे 14 वित्त आयोगातुन पाच टक्के निधी अपंग व्यक्तींना व्यक्तीना वाटप करावे तसेच दलीत वस्ती सिंमेट रस्ता निकृष्ट दर्जा कामासंदर्भात चौकशी , 2016 ते 2020 या काळामध्ये दलित वस्तीचे जेवढे काम झाले तेवढ्या कामाची चौकशी करण्यात यावी व 2017 2020 कामाच्या संगत छायाचित्र अंकात देण्यात यावा यासह विविध कामाची माहीती मिळावी यासाठी उपोषणाला बसले होते.

    या उपोषणाची दखल घेत घनसावांगी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी जाधव साहेब यानी बोङखा येथे उपोषणाला भेट देऊन उपोषणकर्त्या सोबत चर्चा करुन लेखी आश्वासन देऊन मागण्या पुर्ण करु असे पञ दिल्यानंतर कचरु आठवले याचे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलन करते म्हणाले की लेखी देऊनही निधी वाटप न झाल्यास बोगस कामाची चौकशी न झाल्यास आत्मदहन करण्यात येईल याचा जबाबदार ग्रामसेवक सरपंच आणि गटविकास अधिकारी माझ्या जीवाचे काही झाल्यास अधिकारी जबाबदार राहतील असे कचरू आठवले यांनी सांगितलं आहे.