🔸विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा होणार सन्मान

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

यवतमाळ(दि.18ऑगस्ट):-ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

या पुरस्कारामध्ये  ग्रीन फाउंडेशन,वृक्षमित्र ,युवागौरव ,समाजसेवक,कोरोना योद्धा,आदर्श पत्रकार*या विविध विभागामध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी अटी पुढीलप्रमाने:-१)ग्रीन फाउंडेशन पुरस्कारासाठी- निसर्ग सवंर्धन,वृक्षारोपण,व त्याची संपुर्ण माहिती.२)वृक्षमित्र पुरस्कारासाठी- साधारणता आपण १०० वृक्षाचे रोपण केले असावे व संपुर्ण माहिती लेखी व फोटो स्वरुपात असावी.३)युवागौरव पुरस्कारासाठी- शैक्षणिक क्षेत्रात आपणास ८० च्या पुढे टक्के असावे.४)समाजसेवक पुरस्कारासाठी-गावामध्ये,शहर,जिल्ह्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने कार्ये करताय त्याची पीडीएफ स्वरुपात माहिती.५)कोरोना योद्धा पुरस्कारासाठी-कोरोना काळात आपण कोणत्या पद्धतीने कार्ये केले त्याची पीडीएफ.६)आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी-संपुर्ण माहिती आपण पीडीएफ स्वरुपात पाठवावी.प्रस्ताव २०२० मध्ये केलेल्या कामासाठीच घेतले जातील.ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे ग्रीन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.अमितजी जगताप, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अमोल भालेराव यांनी आवाहन केले आहे.!आपली माहिती ही पीडीएफ स्वरुपात 7385471358 या नंबर वर पाठवावी.

पर्यावरण, महाराष्ट्र, यवतमाळ, सामाजिक 

3 thoughts on “पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याचे ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र कडून आवाहन

  1. खूपच छान कार्य आहे . सर्व थांबलं तरी आपण आपले कार्य चालूच ठेवले आहे . विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा आपण गुणगौरव करत आहात खूप अभिनंदन अभिमानास्पद गोष्ट आहे.

  2. वसुंधरा कुटुंब जिवनाचा शिल्पकार आहे

  3. खूपच छान कार्य आहे . सर्व थांबलं तरी आपण आपले कार्य चालूच ठेवले आहे . विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा आपण गुणगौरव करत आहात खूप अभिनंदन अभिमानास्पद गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED