🔸नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर होणार कडक कायदेशीर कारवाई

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा (दि.18ऑगस्ट)-शहरात गणेश उत्सव व मोहरम या सणानिमित्त श्रीगोंदा तहसील कार्यालयात मंगळवार दि.18 रोजी गणेशोत्सव व मोहरम निमित्त शहरातील सर्व गणेश मंडळे व मुस्लिम बांधवांची शांतता बैठक नायब तहसीलदार सायली नांदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळाने कोरोना विषाणूचे सर्व नियम पाळून गणेश उत्सव व मोहरम सण अत्यंत साध्या प्रमाणात साजरा करावा.

ज्या मंडळांना गणेशमूर्ती बसवायची त्यांनी चार लोकांपेक्षा जास्त गर्दी त्या ठिकाणी जमा होणार नाही याची काळजी घ्यावी.

गणेश मूर्ती चारफुटापेक्षा जास्त उंचीची बसवू नये,आगमन,विसर्जन मिरवणुकीवर बंदी राहील,गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रम बंद राहणार,गणेश विसर्जन दोन किंवा तीन लोकांनीच करावे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच श्रीगोंदा शहरात एक गाव एक गणपती बसवण्याची सूचना देखील पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केली.

माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी बोलताना सांगितले की गणेश उत्सव व मोहरम हे सण कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा त्यासाठी नगरपालिकेतर्फे सर्व सहकार्य करण्यात आले.

ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी एक गाव एक गणपती उपक्रमा राबवत गणेश उत्सव साजरा करण्यात यावा त्यासाठी श्रीगोंदा शहरात देखील श्री संत शेख महमद महाराज पटांगणात एकच गणपती बसवावा असे आवाहन केले.

त्यानुसार सर्व गणेश मंडळांनी या आवाहनाला मान्यता देत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्याचे सर्वानुमते संमती दिली.

परंतु नगरसेवक शहाजी खेतमाळीस,प्रशांत गोरे यांनी ज्या मंडळाचे प्रतिनिधी अनुपस्थित असतील त्यांना बोलावून परत बैठक घ्या असे सांगितले त्यावर उपस्थित सर्वांनी निर्णय झाला असून जे लोक विरोध करतील त्यांना आपण सर्व जण समजावून सांगू असे सांगितले.

शिवसेनेचे संतोष खेतमाळीस यांनी सर्व नियम अटींचे पालन करू,शांततेत गणेशोत्सव पार पाडू असे आश्वासन यावेळी दिले.

या शांतता बैठकीस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, प्रा. तुकाराम दरेकर, दत्ताजी हिरणावळे, प्रशांत गोरे, संतोष खेतमाळीस, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, नगरपालिकेच्या प्रियंका शिंदे यांच्यासह तालुक्यातील गणेश उत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

धार्मिक , बाजार, महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED