

✒️सचिन महाजन(वर्धा,जिल्हा प्रतिनिधी ):-मो 9765486350
वर्धा(दि.19ऑगस्ट):- रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला याप्रसंगी त्यांनी सेवाग्राम व सांवगी(मेघे) येथील कोव्हिड सेंटरला भेट देत एकुण परिस्थितीचा आढावा घेत पुढिल काळात जास्तीत जास्त दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी त्यांना तीन महिण्या आधी आलेल्या सेलु तालुक्यातील पिंपळगाव,हमदापुर व इतर गावातील जवळपास ३५० घरांचे टिनपत्रे चक्रीवादळ व पावसामुळे उडून जात प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे तसेच मा.पालकमंत्री,वर्धा जिल्हा यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देते वेळी दिलेल्या शासकीय आर्थिक मदतीच्या आश्र्वासानाची पुर्तता न झाल्याने राज्य शासनास तातडीने सदर गावातील नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळावे.
याकरीता सुचना करावी असे पत्र दिले त्याच प्रमाणे धडक सिंचन योजनेच्या जवळपास ११ हजार विहिरीचे अनुदान न आल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून त्यांना सुध्दा तातडीने अनुदान मिळावे व रमाई घरकुल योजने अंतर्गत थकीत अनुदान लाभार्थी नागरिकांना देण्याच्या सूचना राज्य शासनास द्यावे असे पत्र दिले असून यासंदर्भात शासनासह चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.या दौ-या प्रसंगी मा.चंन्द्रशेखरजी बावणकुळे,माजी मंत्री महाराष्ट्र राज्य,खा.रामदासजी तडस,आम.दादारावजी केचे,मा.राजेशजी बकाणे, प्रदेश सचिव भाजपा, डॉ.शिरीष गोडे, जिल्हाध्यक्ष वर्धा भाजपा आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.