मरखेल आन्द्रा बँकेत खातेदारांची तोबा गर्दी, कोरोना महामारीची ऐशी की तैशी !

15

✒️दादाराव बेळीकर(देगलूर,तालुका प्रतिनिधी) मो:-7588582100

देगलूर(दि.19ऑगस्ट):-मरखेल येथे आंद्रा युनियन बँकेत पीककर्ज मागणीसाठी खुप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.कोरोनाने हाहाकार माजवला असून रुग्ण संख्येत दररोज मोठ्यानी वाढ होत आहे.
मरखेल-हाणेगाव परिसरात कोरोना संसर्गाने दोन रुग्णाचे मृत्यू झाले आहे. तरी आता तरी जागे व्हा,मरखेल ला रुग्ण आडळून आले आहेत, तरी आपण कर्ज मागणी साठी आल्याने, तोडला मास्क, कमीत कमी तीन ते चार फुटाचे अंतर ठेवले पाहिजे,म्हणजे आपणास कोरोना संसर्ग होउ शकत नाही.ग्रामीण भागातून आलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत, कारण आपल्या मध्ये सुध्दा रुग्ण असु शकतो हे आपण काळजी घेतले पाहिजे, या संबंधीत वरिष्ठ अधिकारी मरखेल येथे आन्द्रा बँकेकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना सोशियल ठेवून शेती कर्ज देण्याची वेवस्था करण्यात यावे अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.