गडचिरोली जिल्हयात आज (दि.19ऑगस्ट) रोजी 5 कोरोनामुक्त तर 7 नवीन कोरोना बाधित

    48

    ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गडचिरोली(दि.19ऑगस्ट):- जिल्हयात आज 5 जण कोरोनामुक्त झाले असून यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 4 यामध्ये 1 सीआरपीएफ 2 एसआरपीफ, 1 दवाखान्यातील कर्मचारी, आरमोरी येथील 1 असे एकूण 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.

    तर 7 नवीन कोरोना बाधित त्यापैकी आहेरी येथील 4 यामधे बिहार वरुन आलेले 2, कागजनगर वरुन आलेला 1, जिल्ह्यातील नागपुर येथे उपचार घेत असलेला कैंसर पिडीत, तर भमरागाड़ लाहेरी येथील 2 पुलिस व गडचिरोली येथील डॉक्टर च्या संपर्कातील 1 जण बाधित आढळून आला.

    यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 139 झाली असून एकुण बाधित संख्या 856 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 716 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.