कोरोना मृतकच्या अंत्यविधी स्थळ बदलावे

31

🔹आम आदमी पार्टीची मागणी

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपुर(दि.20ऑगस्ट):- शहर महानगर पालिका तर्फे कोरोना अाजाराने मृतक पावलेल्या व्यक्तीचे अंत्यविधी पठाणपूरा गेट- माना रोड येथे मागिल काही काळापासून स्मशान भूमी वर केल्या जात अाहे. त्यांमुळे परिसरातील नागरिकान मध्ये कोरोना पसरण्याची भिती निर्माण झाली अाहे. अाज दि, 20 अाॅगस्टला परिसराती नागरिक व अाम अादमी पार्टी यांच्या वतीने मनपा अायुक्त याना कोरोना मृतकांच्या अंत्यविधीची जागा बदलविण्याची मागनी करण्यात अाली.

पठाणपूरा गेट- माना रोड वर सकाळ- संध्याकाळ मिळून साधारण पाच हजार नागरिक या मध्ये ,पुरुष,महिला,तरुण युवक-युवती हे भ्रमण, योगा, व्ययामा वैगरे दररोज करत असतात.

परंतु मागिल काही दिवसापासून येथे कोरोना रूग्णांचा अंत्यविधी कार्यक्रम सुरू झाला. त्यामूळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले अाहे. कोरोणा मृतक व्यक्तीचा अंत्यविधी स्थळ येखाद्या निर्जन स्थळी हलवावे अशी मागनी निवेदना द्वारे मनपा अायुक्ताना करण्यात अाली. निवेदन देताना विजय चाहारे, किशोर अाकोजवार, वंसत चाहारे, सचिन कोतपल्लीवार, पी. एम. शेलार, अनुप चिवंडे, रुपेश शर्मा, रमेश काळे, कालीदार वाटगुरु, सुशील भागवत सह अापचे माहानगर संघटन मंत्री प्रशांत येरने, उपाध्यक्ष सूनिल भोयर, योगेश अापटे, जिल्हा कोषाध्य भिवराज सोनी, सहसचिव अजय डुकरे, अशोक अांनदे, दिलीप तेलंग, राजेश चेंडगुल्लवार अादींची उपस्थिती होती.