आज (दि.20ऑगस्ट) चंद्रपूर जिल्ह्यात 54 तर गडचिरोली जिल्ह्यात 10 नवीन कोरोना बाधीत

15

🔺चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या पोहचली 1249 वर

🔺गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 866

✒️चंद्रपूर/गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर/गडचिरोली(दि.20ऑगस्ट):-चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1249 वर पोहोचली आहे. यापैकी, उपचाराअंती 851 कोरोना बाधित बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 386 आहे. गेल्या 24 तासांमध्ये नवे 54 बाधित पुढे आलेले आहेत.

जिल्ह्यात 52 वर्षीय गडचांदूर येथील पुरूषाचा मृत्यू झालेला आहे. बाधित कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराने ग्रस्त होता. बाधिताला 17 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 ऑगस्टला बाधिताचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केलेले आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 12 असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 10 तर तेलंगाणा राज्य व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथील सुरक्षा रक्षक बाधित आढळल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने स्वतःहून दोन दिवस अलगीकरणात राहणार आहेत. ते विश्रामगृहातूनच कामकाज बघणार असून जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केवळ अत्यावश्यक कामे असणाऱ्यांनीच यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 22, बल्लारपूर येथील आठ, मुल येथील चार, राजुरा, गडचांदूर, कोरपना, सावली येथील प्रत्येकी एक, भद्रावती येथील चार ब्रह्मपुरी येथील 11 तर आसाम येथून आलेला एका बाधिताचा समावेश आहे. असे एकूण 54 बाधित ठरले आहेत.

चंद्रपूर शहरातील तुकूम पोलिस कॉर्टर परिसरातील दोन, खत्री कॉलनी एक, बाबुपेठ दोन, लक्ष्मी नगर एक, जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षारक्षक एक, एसएससी कॉलनी परिसरातील दोन, तर शहरातील इतर भागातील सहा बाधित पुढे आलेले आहेत.

बल्लारपूर येथील पोलीस कॉर्टर परिसरातील तीन, आंबेडकर वार्ड एक, दादाभाई नौरोजी वार्ड एक, बालाजी वार्ड दोन, रविंद्र नगर एक बाधित आढळले आहे.

मूल येथील दोन तर तालुक्यातील कांतापेठ व ताडाळा येथील प्रत्येकी एक बाधित पुढे आलेले आहेत. भद्रावती येथील तीन तर तालुक्यातील सुमठाणा येथील एक बाधित पुढे आला आहे.

ब्रह्मपुरी शहरातील एक, हनुमान नगर 2, गांधी नगर 2, सुंदर नगर एक, गुरुदेव नगर 2 तर तालुक्यातील चिखलगाव येथील दोन, बेटाळा येथील एक बाधित आढळलेले आहे.

जिल्ह्यात 21 हजार 154 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 314 पॉझिटिव्ह असून 20 हजार 840 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 93 हजार 762 नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 1 हजार 64 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 607 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.

वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1 हजार 249 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 26 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 98 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 711 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 312 बाधित, 61 वर्षावरील 72 बाधित आहेत. तसेच 1 हजार 249 बाधितांपैकी 861 पुरुष तर 388 बाधित महिला आहे.

राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:

1 हजार 249 बाधितांपैकी जिल्ह्यातील 1144 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 42 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 63 आहे.

                           ——————-

🔺गडचिरोली जिल्हयात आज 19 कोरोनामुक्त तर 10 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली:- जिल्हयात आज 19 जण कोरोनामुक्त झाले असून यामध्ये गडचिरोली येथील 16 जणांचा समावेश आहे. यात 2 जिल्हा पोलीस, एसआरपीएफ ग्यारापत्ती येथील 12 जवान, तसेच ग्यारापत्ती पोलीस वसाहतीमधील येथील एक लहान मुलगा, व एक स्थानिक नागरिकाचा समावेश आहे. धानोरा येथील 1 सीआरपीएफ जवान ही आज कोरोनामुक्त झाला. चामोर्शी येथील स्थानिक नागरिक व कोरची येथील आरोग्य विभागामधील कर्मचारी असे एकूण 19 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.
तर 10 नवीन कोरोना बाधितांमध्ये रूग्णाच्या संपर्कातील कोरची येथील 2 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर चामोर्शी तालुक्यात 2 यात आष्टी येथील 1 व इतर 1 जण बाधित आढळला. तर ग्रामीण रूग्णालय भामरागड येथील नांदेड येथून आलेला विलगीकरणातील कर्मचारी पॉझिटीव्ह अढळला. गडचिरोली येथील 2 जण इतर बाधित रूग्णांच्या संपर्कातील विलगीकरणात ठेवलेले बाधित आढळले. धानोरा येथील 2 जण बाधित असून आज एकूण 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 125 झाली असून एकुण बाधित संख्या 866 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 740 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.