खटाव तालुक्यात पावसाचा जोर मंदावला

10

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.20ऑगस्ट):-जून महिन्यापासून पिकांसाठी चांगला पडत असलेला पाऊस मागील काही दिवसापासून मंदावला असल्याने खटाव करांच्या चिंतेत वाढ झाली आहे. खरीप हंगामासाठी पाऊस पाऊस चांगला झाला असला तरी खटावकर यांना अद्यापि मोठ्या पावसाची अपेक्षा आहे नाहीतर पुन्हा दुष्काळाला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगामासाठी जून महिन्यापासून शेतकऱ्यांना सुखावणारा पाऊस सुरू झाला. पिकेही जोमात आली ,आता हंगाम सुगीत आला तरी तालुक्यातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अद्यापही दिसून येत नाहीत.भूजल पातळी मध्ये अद्यापि वाढ झालेली नाही.

खटाव तालुक्यात मंडल नीहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे खटाव ब एमएम, औंध380.80 एमएम,पुसेगाव 464.29 एमएम, पुसेसावळी450.40 एमएम,बुध398.40 एमएम, वडूज 290.30,मायणी 404.80,निमासोड 264.20,कातर खटाव 424.80,झाला असून सरासरी खटाव तालुक्यात 382.33 येवढाच पाऊस पडल्याने. जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत खटावकर आहेत.