सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु .. बाबुराव मदने

    42

    ✒️अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    अहमदनगर(दि.21ऑगस्ट):-संपुर्ण महाराष्ट्रात रोजगार निर्माण परीषेदेच्या आणि सरपंच सेवा संघ महाराष्ट्र च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर स्वयमरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेळावे प्रशिक्षण जनजागृती करून सरपंच यांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या महामंडळाच्या योजना यांची माहिती उपलब्ध करून राज्य भर तरुणांना स्फूर्ती देणारा प्रकल्पाची उभारणी तसेच तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून महाराष्ट्र भरातील तरुणांना या बाबत मार्गदर्शन सहकार्य आथिर्क सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या महामंडळाचे कर्ज प्रकरण स्पसीडी उपलब्ध करून शासनाच्या योजनांचा लाभ तरुणांनी एकत्र येऊन तरूणांना रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करणारं असलेचे मत बाबुराव मदने यांनी बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर यांच्या शी संवाद साधताना व्यक्त केले आहे. नुकताच संगमनेर येथे रोजगार निर्माण परीषेदेचे श्री मदने यांच्या शिष्टमंडळाने श्री पावसे यांची समक्ष जाऊन संवाद साधला आहे.