माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

13

✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गोंदिया(दि.21ऑगस्ट):-श्री वसंतराव नाईक वाचन मंदीर ,पाथर्डी,अहमदनगर तर्फे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा नुकताच ऑनलाईन निकाल लावण्यात आले होते.खुला गटात वय 18 वर्षे पुढे खुल्या वयोगटात प्रथम क्रमांक श्री. राजेंद्र धर्मदास बन्सोड,आमगाव, जिल्हा गोंदिया यांनी पटकाविला.

प्रथम क्रमांक विजेत्यांना 1001 रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले.विजेत्या स्पर्धेकांचे श्री वसंतराव नाईक वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत पवार,निबंध स्पर्धेचे पर्यवेक्षक राजू पवार,डॉ.संदीप पवार काळू जाधव,विलास पवार यांनी अभिनंदन केले आहे.राज्यस्तरावर विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला.यातून श्री वसंतराव नाईक यांच्या जीवनप्रवास आणि महाराष्ट्र राज्याच्या कल्याणासाठी केलेल्या योगदान यावर सखोल माहिती आणि प्रकाश टाकण्यात आले.
विजेत्या स्पर्धकांचे मित्रपरिवार आणि आप्तस्वकीयांनी कौतुक केले. या यशाबद्दल राजेन्द्र बन्सोड यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.