✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.21ऑगस्ट):-सध्या कोरोना या आजारामुळे सर्व शैक्षणिक आस्थापने, शाळा, महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्क फ्रॉम होम पद्धतीने हळूहळू शैक्षणिक कार्य चालू आहे. याच पार्श्वभूमीवर स्वा. वि. गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषीदूत सुमित दडमल यांनी ग्रामीण उद्यानविद्यान कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील नवेगाव (पेठ) येथील नागरिकांना वृक्षलागवड विषयी माहिती दिली. तसेच वृक्षाचे फायदे याबद्दल थोङक्यात माहिती दिली. वृक्षांची घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन दिले.
यावेळी सरपंच शकुंतला कोसरे, सतीश कोसरे, गोवर्धन मुंडरे, सुमेध भरडे, आदित्य तांदुळकर, सौरभ कुबडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषीदूतांना उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य पंचभाई व उपप्राचार्य धरमाळ, कार्यक्रम अधिकारी रोशन राऊत व विषयतज्ञ साळी यांचे मार्गदर्शन लाभले.

पर्यावरण, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED