🔸नियमन मुक्तीचा आदेश मागे घेण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी चिमुरात आंदोलन

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.21ऑगस्ट):- केंद्राने सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेश मागे घ्यावा व बाजार समिती कर्मचाऱ्यांना  कर्नाटक राज्याप्रमाणे शासकीय सेवेत घ्यावे या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूरच्या कर्मचाऱ्यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजता पासुन बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवत लाक्षणिक संप पुकारले आहे.

केंद्र सरकारने 5 जून रोजी अध्यादेश काढून बाजार समित्यांच्या आवराबाहेरील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार नियमन मुक्त करून बाजार शुल्क रद्द केले आहे.बाजार शुल्क रद्द केल्यामुळे बाजार समितीचे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गाच्या वेतनावर परिणाम होणार आहे. तसेच बाजार समितीच्या आवारा बाहेर शेतमालाची खरेदी विक्री झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. बाजार समितीला बाजार शुलकातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा देखरेख, वीज पाणी,  गोडाऊन, शेड,  वजन काटे, आदि खर्च भागविणे अवघड होणार आहे. यामुळे केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश मागे घेऊन राज्यातील बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात समितीचे सभापती श्री.माधव बापू घनश्याम जी बिरजे, म.रा.बाजार समिती संघ पुणे चे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी श्री.घनश्याम पांडुरंगजी डुकरे,समितीचे सदस्य श्री.मोहिनकर आणि समितीचे सचिव श्री.ढोणे,लेखापाल श्री. काशिवार व समितीचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. 

कृषिसंपदा, पर्यावरण, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED