अँड. बाळासाहेब आंबेडकरांचे मंदिर प्रवेशाचे आंदोलन हे मनुवादी नसून मानवतावादी विचारांचे संविधान सुरक्षा आंदोलन आहे

58

🔸लिंगायत आंदोलनाचे नेते तथा बसव कथाकार शिवानंद हैबतपुरे यांचे प्रतिपादन

✒️नवनाथ पौळ(केज जि.बिड ,प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.21ऑगस्ट):-वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा व बहुजन लोकनायक बाळासाहेब आंबेडकरांनी अकोला येथील लाँकडाऊनला न जुमानता राजराजेश्वर महादेवाच्या मंदिरात प्रवेश केला आणि संपूर्ण देशात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली. त्यातच त्यांनी ३१ आँगस्ट ला चलो पंढरपूर हा नारा दिल्यामुळे तर चर्चेला आणखीनच उधाण आले.

वास्तविक पहाता बाळासाहेब आंबेडकर हे एक अजब रसायन आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतीक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील हे स्वतंत्र प्रतिभेचे बुद्धीजीवी व लोकहितवादी नेतृत्व समजून घेणे आवश्यक आहे.

बाळासाहेबांनी मंदिर प्रवेशाचा नारा दिल्याबरोबर अनेकांच्या मेंदूला वेगवेगळे झटके येणार याचा मला अंदाज होताच. कारण जे थेट मेंदुला झटके देतात तेच आंबेडकर असतात.

त्यातच मी लिंगायत आंदोलनात काम करणारा कार्यकर्ता आहे. महात्मा बसवण्णांनीही मंदिर संस्कृतीवर कडाडून हल्ला केला आहे. अगदी सर्वच महापुरुषांनी मंदिर व्यवस्थेकडे पाठ फिरवली असतानाच मा.बाळासाहेब मात्र मंदिर प्रवेशाची हाक देतात हे कांहीजणांसाठी अनाकलनीय आहे.

एर्हवी समाजकारण आणि राजकारण हे जाती-धर्माच्या खुंटीला बांधणार्या व त्याच्या भोवती फिरणाऱ्या माझ्या काही तथाकथित बुद्धिवादी पण संकुचित मनाच्या मित्रांना बाळासाहेब आंबेडकरांची भुमिका समजणे काहीसे आवघडच आहे. कारण त्यासाठी लागणारी व्यापक दृष्टी ही प्रत्येकाजवळ असतेच असे नाही. वास्तविक पहाता बाळासाहेब आंबेडकर हे जनसामांन्यांचे नेते आहेत. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांच्या मौलिक अधिकाराचे जतन करणे हाच त्यांच्या प्रत्येक आंदोलनाचा हेतु असतो. एखादी भुमिका घेत असतांना ते कधीही परिणामाची चिंता करत नसतात. फायदा-नुकसान हे दोन्ही शब्द बाळासाहेबांच्या शब्दकोशात नाहीत त्यामुळेच त्यांच राजकारण हे समजायला आवघड आहे. एर्हवी राजकीय यश-अपयशाचे मोजले जाणारे सगळे मापदंड हे बाळासाहेब आंबेडकरांपुढे हतबल ठरताना या महाराष्ट्राने अनेकवेळा पाहिले आहे. मी मा. बाळासाहेब आंबेडकरांना जवळून पाहिले आहे. अनुभवलं आहे. ते केवळ आणि केवळ संविधानिक आहेत. सामान्य नागरिकाच्या मुलभूत अधिकार आणि हक्काचे ते आग्रही आहेत. आणि याच भूमिकेतून त्यांनी हे आंदोलन हाताशी घेतलं आहे. वास्तविक पहाता मंदिर प्रवेशाचे हे आंदोलन धार्मिक आंदोलन नसून हे आंदोलन संविधानाच्या अमलबजावणीचे आंदोलन आहे.

सद्यस्थितीत कोरोनाच्या नावाखाली बेबंदशाही व अघोषित आणिबाणी चालू आहे. सामान्य माणूस अगदी पिळवटून निघाला आहे. तोंड दाबून बुक्याचा मार चालू आहे. देशाच्या सर्व क्षेत्रात एक मोठी उदासीनता आली आहे. भ्रष्टाचार शिगेला पोहंचला आहे.या लाँकडाऊनच्या आड केंद्र व राज्यसरकारचा नाकर्तेपणा लपतो आहे. भांडवलशाही आपला मनसुबा यशस्वी करत आहे. मानवी स्वातंत्र्य व मौलिक अधिकार अक्षरशः पायदळी तुडवले जात आहेत. अशा परिस्थितीत लोकक्षोभाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन मा.बाळासाहेब आंबेडकरांनी हाती घेतलं आहे. मंदिर प्रवेश करुन काय वंचित समुहाला घंटा वाजवत बसायचे नाही की मग कुठला अभिषेक घालत बसायचं नाही.आम्हाला मंदिराच्या या मुद्यावर केवळ इथल्या लोकांना आपल्या अधिकाराची जाणीव करुन द्यायचे आहे.

धर्म आणि उपासना हे या मातीचे कळीचे मुद्दे आहेत. हेच मुद्दे आता याच सत्ताधारी हुकूमशाहांना सळो की पळो करुन सोडणार आहेत.

आज राजरोस बिअर-बार चालू आहेत. मटके-गुटखा चालू आहे. कारण त्यातून मोठे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत. प्रत्येक वस्तुची किंमत वाढली आहे. चढ्याभावाने जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत. एकंदरीतच हे लाँकडाऊन गरिब व मध्यमवर्गीय लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या जीवघेण्या षडयंत्रातुन मुक्त व्हियचं असेल तर आता लोकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. म्हणून मग मुलनिवासींचा मुलपुरुष राजराजेश्वर महादेव आणि विटेवरल्या विठ्ठलाच्या मंदिर प्रवेशाचे निमित्त साधले गेले.

बहुजन समाजाला नेहमीच मानसिक बळ देणारा व समतेचे तत्वज्ञान मांडणारा वारकर्यांचा हा लाडका नायक कधी शिवभक्ताच्या रुपात तर कधी बुद्धाच्या रुपात लोकांच्या ह्रदयात विराजमान आहे.

त्या विठ्ठलाच्या मंदिर प्रवेशाने आम्हाला धार्मिक मुक्ती नव्हे तर सरकारच्या बेबंदशाहीतुन मुक्ती हवी आहे. बाळासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी हे देव-धर्माच्या परिघा पलीकडे पोहंचले आहेत. प्रत्येकाला स्वधर्माच्या पालनाचा संपूर्ण अधिकार मान्य करणारे ते लोक आहेत. आज बाळासाहेब आंबेडकरांचा धर्म आणि जात हे भारतीय संविधान आहे* आणि ते सुरक्षित असावे यासाठी हा अट्टाहास आहे.

मा.बाळासाहेब आंबेडकरांचे हे आंदोलन धर्म आणि देवाचे आंदोलन नाही तर ते आमच्या मुलभूत अधिकाराचे आंदोलन आहे. हे आंदोलन मनुवादाचे आंदोलन नसून केवळ मानवतावादाचे व मौलिक अधिकाराचे आंदोलन आहे. म्हणूनचमी मंदिर संस्कृतीचा समर्थक नसतानाही मा.बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहे.

———

आंदोलनाबाबत अँड.शिवानंद हैबतपुरे (बसव कथाकार)प्रदेश अध्यक्ष – महाराष्ट्र बसव परिषमो .9096951179/8788711477 यांचेशी संपर्क साधावा