मराठा क्रांती ठोक मोर्चा महाराष्ट्र उभा राहणार ग्रामीण विद्यार्थ्यांसोबत

54

🔸मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन सादर

✒️आतुल बडे(परळी,तालुका प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी (दि.21ऑगस्ट):-उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चा आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहणार आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी राज्यातील सर्व पदाधिकारी यांची झूम मिटिंग घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी भूमिका घेतली असून मंत्री उदय सामंत व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन ,राज्यात सरकारने ऑनलाईन शिक्षणासाठी घेतलेला निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठ नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे ,शासकीय अधिकारी आणि मंत्री यांनी शहरी भागाचा विचार करून ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केली असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याकडे पूर्ण पणे दुर्लक्ष केलेले आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सरकारने अँड्रॉइड मोबाईल देण्यात यावेत प्रत्येक गावामध्ये नेटवर्किंग साठी मोबाईल टावर उभे करावेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी तात्काळ निर्णय घेऊन ऑनलाइन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत करावी ,अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना JEE/NEET/CET चे महागडे क्लासेस कुठून आणणार ?शिक्षण फक्त धनदांडग्याच्या पोरासाठीच आहे का ?
#राज्यात एकच CET लागू करावी /चालू वर्षी CET ची परीक्षा रद्द करा ,JEE/NEET च्या नावाखालाचा क्लासेसचा बाजार मांडला असून मुलानी 12 ची परीक्षेची तयारी करायची परीक्षेची तयारी करायची ?हे पहिले सरकारने स्पष्ट करावे ,,JEE/NEET/CET सारख्या परीक्षेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्लासेस उपलब्ध आहेत का ? या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते ,यासाठी राज्यातील प्रवेश प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 12 वीच्या गुणवत्ते नुसार इंजिनीरिग आणि मेडीकल साठी व इतर विभागामध्ये प्रवेशासाठी राउंड ठेवावेत ,CET सारखी परीक्षा एकच घेतली जात नाही तर प्रत्येक विभागाला वेगळी CET प्रत्येक कॉलेजला वेगळी CET ठेवून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळन्याचा धंदा त्वरित बंद झाला पाहिजे ,यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी शिक्षणमंत्री यानी घ्यावी ,राज्य सरकार मधील शासकीय अधिकारी शहरी भागातील शिक्षण व्यवस्था डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कधी ऑनलाइन मुळे तर कधी जाचक अटीमुळे प्रवेश घेता येत नाहीत ,शिवाय या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सरकारी शाळा कॉलेज मध्ये जागा शिल्लक असून विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाहीत ,यासाठी आता ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सरकारच्या विरोधात राज्यभर उठाव करण्याचा निर्णय आबासाहेब पाटील यांनी घेतला आहे ,राज्यभरात पुढील शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 12 वीचे गुण(टक्केवारी)ग्राहय धरण्यात यावेत अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक असून आता शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास ग्रामीण भागात राज्यभर कॉलेज बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
सदर झूम बैठकीला राजेंद्र निकम मुबंई, बाबा शिंदे सातारा, सागर धनवडे कोल्हापूर ,अमर वाघ कल्याण ,आकाश पाटील लातूर ,संजय डुकरे पाटील नवी मुंबई, बीड प्रतिनिधी बाळासाहेब पाथरकर ,अशोक जाधव विद्यार्थ्यांच्या मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रज्वल पाटील, अक्षय इंगळे ,ओंकार महागोविंद पाटील ,उर्मिला काळजे ,प्रियंका पाटील ,संजीवनी देशमुख ,कांचन शिंदे मराठवाडा अध्यक्षा प्रतिभा जगताप व इतर सर्व जिल्हा प्रतिनिधी उपस्थिती होते
—– ———– —— ——– –

आगामी आंदोलनाची भूमिका बाबतीत सविस्तर माहिती करीत मा.आबासाहेब पाटील
9049335253 यांचे संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे