अंतरवली बु, येथील शेतकऱ्यांची एक वर्षापासून रखडलेले 1 कोटी 25 लाख रुपयेअनुदानानाचा प्रश्न लागला मार्गी

27

🔸माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे प्रयत्नाला यश

🔹गावकऱ्यांच्या वतीने अमरसिंह पंडित यांचे आभार

✒️देवराज कोळे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:;८४३२४०९५९५

गेवराई(दि.21ऑगस्ट):- तालुक्यातील अंतरवली बु, येथील पूर्ण गावातील शेतकऱ्यांचे एक वर्षापासून रखडलेले अनुदान शेतकऱ्यासाठी धावून येणारे गेवराई तालुक्याचे माजी आमदार अमरसिंह पंडित नेहमी शेतकऱ्यांच्या दुःखात सहभाग देणारे आज एक कोटी 25 लाख रुपयांची चेक तलाठी सुलाखे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुपूर्द केला .अंतरवली येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आनंद झाला आहे .
गणपती ,पोळा, महालक्ष्मी सण तोंडावर येऊन ठेपलेल्या आहे आज शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात मदत झालेली चित्र पाहावयास मिळत आहे. खरोखरच नेहमी अमरसिंह पंडित गेवराई तालुक्याच्या समस्या जिल्हा ठिकाणी नव्हे तर मंत्री मंडळात सुद्धा नेहमी मांडत असतात, त्यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे नेहमी गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी नेहमी सहकार्याची भूमिका ठेवतात चांगलं काम करत असताना ते माझे पक्षाचा आहे की नाही हा कधीही विचार अमरसिंह पंडित यांनी केला नाही .ते कोणत्याही पक्षाचा माणूस असू दे त्यांचेकडे काम घेऊन आला की त्याचा काम करणार अशी भूमिका ठेवणारे अमरसिंह पंडित आहेत.

एक वर्षापासून रखडलेल अंतरवली बु, येथील शेतकऱ्याच्या अनुदान प्रश्न मार्गी लावल्याबद्दल.गणपती , लक्ष्मी सण आनंदात जाणार होणार आहे, गावकऱ्यांच्या वतीने अमरसिंह पंडित यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या अनुदानासाठी अंतरवाली येथील उपसरपंच किरण पंडितराव वावरे यांनी वेळावेळी अमरसिंह पंडित यांचेकडे मागणी केली होती, या मागणीला आज अखेर यश प्राप्त झाले आहे.
या वेळी किरण पंडितराव वावरे उपसरपंच, दीपक उमप सरपंच , सुरेश वावरे, कृष्णा बापू वावरे, अंकुश वावरे, अजिंक्य वावरे, डॉ अरविंद जाधव, बबन वावरे समस्त आंतरवली बु येथील ग्रामस्थांनी आभार मानले आहे.