शिक्षकांना कोविड-19 च्या कामातून मुक्त करा

28

🔹शिक्षणाधिकारी वर्धा यांना महाराष्ट्र माध्य.डीएड शिक्षक महासंघाचे निवेदन

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वर्धा(दि.22ऑगस्ट ):-जिल्हा परिषद वर्धाचे शिक्षणाधिकारी(माध्य.) यांची महाराष्ट्र माध्यमिक डीएड शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शिक्षकांना कोविड-19 च्या कार्यातून मुक्त करावे. शासनाच्या 17 ऑगस्ट 2020 च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील सेवा जेष्ठता व पदोन्नती या विषयावर ही चर्चा झाली.सेवाजेष्ठता यादीवर शिक्षकांचे आक्षेप असतील तर सुनावणी लावल्याशिवाय व निर्णय दिल्याशिवाय कोणत्याही पदोन्नतीला मान्यता दिली जाणार नाही असे आश्वासन शिक्षणाधिकारी वर्धा यांनी दिले.

कोविड-19 च्या अटी पाळून शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोजकेच शिक्षक उपस्थित होते. उपस्थितांमध्ये महासंघाच्या अध्यक्षा पद्मा तायडे, जिल्हाध्यक्ष रेखा जुगनाके मॅडम, क्रीडाशिक्षक खराबे ,जिल्हा पदाधिकारी बोरगमवार , सावित्री सोनटक्के उपस्थित होत्या.