🔹भंडारा जिल्ह्यातील अड्याळ तालुक्यातील गैरप्रकार

✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भंडारा(दि.22ऑगस्ट):-वन विभागामार्फत वनपरिक्षेत्रालगतच्या विकासासाठी ग्रामीण भागातील खेडे गावात श्रमिकांची, व आर्थिक व्यवहाराची पारदर्शकता असावी म्हणून ग्रामवन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत .मागील अनेक वर्षांपासून पिलांद्री ग्रामवन समितीकडून गैरव्यवहार केला गेला असल्याची तक्रार करून चौकशीची मागणी जिल्हा वनअधिकारी यांच्या कडे केली असल्याने परिसरात चर्चेला उत आला आहे.

भंडारा जिल्ह्यातील अडयाळ परिक्षेत्रातील पिलांद्री येथील ग्रामवन समितीकडून रोजनदारीचे कामे व ग्रामिंणभागतील जनतेला नवीन ग्यास कनेक्शन देण्यासमबंधी योजना राबविण्यात आली शासकीय जाहिरातीप्रमाणे 1350 रुपये प्रती लाभार्थी खर्च घेणे होते पण ग्रामवनसमितीच्या सचिव एस .एल. सार्वे यांनी काही ग्रामवासीयांकडून 2500 रुपये खर्च घेतल्याची तक्रार केली आहे ,नवीन ग्यास कनेक्शन 1/4 रक्कम भरून घेता येते तरी नवीन कनेक्शन दिल्या गेले नाही,पिलांद्री गावाच्या गेट तयार करण्यासाठी खोदकाम सुरू झाले मात्र नंतर ते काम थंड बसत्यात का गेले?याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे 9 जानेवारी 2020 ला नवीन ग्राम वन समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली पण एकही सभा घेण्यात आली नाही व समितीला विश्वासात न घेता परस्पर दिड लाख रुपयांचा आर्थिक अफरातफर झाल्याने चौकशीची मागणी ग्रामवन समिती ने केले आहे.

तर आमच्या प्रतिनिधीनी विचारणा केली असता ग्रामवनसमिती सचिव एस.एल.सार्वे यांनी सांगितले की,कोणत्याही प्रकारचा आर्थिक आर्थिक गैरव्यवहार झाला नाही जिल्हा वनअधिकारी यांच्या पत्रानुसार कोका वनविभागाकडे 150000 रुपये निधी परत केलेला आहे,वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे म्हणाले की,कोणताही आर्थिक गैरव्यवहार झालेला नसून समितीच्या सदस्यांचा नासमजपणा आहे नवीन ग्यास कनेक्शन 1327 रुपयाचे असले तरी रिफिलिंग खर्चाचे 2400 चे वर खर्च पडतो समितीच्या पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असेल तर समिती रद्द करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला असल्याचे सांगितले मात्र सदर प्रकरणात जिल्हा वन अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामवनसमिती अध्यक्ष जोतिराम मडावी,गिरीधर बोकडे, धर्मेंद्र मेश्राम,उमेश बोकडे,पंकज बोरकर,हिवराज बारेकर, रत्नदीप जांभूळकर ,शुभम शेंडे,जयश्री रोहनकर, सौ शोभा बोकडे,सौ खेल वनता आरिकर,कु.गीता शिवणकर आदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महाराष्ट्र, मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED