✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.22ऑगस्ट):-नायगाव दि.20 आॅगस्ट रोजी नायगाव येथुन जवळच असलेल्या मौजे बेटकबिलोली ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातुन दिव्यांग बांधवांच्या 5% निधीचे वाटप केल्यामुळे दिव्यांगांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे त्यात एकुन 15 दिव्यांगांना प्रत्येकी 5000 रू चे चेक प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या कालावधीत दिव्यांगाना दिलेला निधी हा ईतर ग्रामपंचायतीसाठी एक आदर्श ठरेल.या निधी वाटपाच्या छोटे खानी कार्यक्रमाला बेटकबिलोली चे सरपंच श्री राहूल पाटील नकाते, उप. सरपंच श्री मारोती पाटील पवार, ग्रामसेवक श्रीयुत पवळे साहेब, तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, श्री.साईनाथ बोईनवाड
नायगाव तालुका अध्यक्ष, राजेश बेळगे तालुका सचिव, माधव पा. जानोरे नरसी विभाग प्रमुख, मिलींद कागडे नांदेड जि. उप अध्यक्ष, गोपिनाथ मुंढे नांदेड जि. कार्याध्यक्ष, श्री. मारोती माधवराव मंगरूळे नांदेड जिल्हा सचिव, व ईतर ग्रामस्थ हजर होते.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED