अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्या- खासदार हेमंत पाटील

14

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

सेनगाव(दि.22ऑगस्ट):- मागील आठवडाभर हिंगोली लोकसभा क्षेत्रातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून सगळीकडे दमदार पाऊस होत आहे, हिंगोली लोकसभा क्षेत्रात सुद्धा मागील दहा दिवसापासून पाऊस सतत सुरू आहे यामुळे अनेक हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कयाधू,पूर्णा, पैनगंगा नद्यांना आलेल्या पूरामुळे हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड, महागाव या तालुक्यातील नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात खरीप मुग, उडीद, कापूस, हळद, सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले असून काही भागात सोयाबीन पिकांवर पाने पिवळी होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून याबाबत खासदार हेमंत पाटील त्यांनी प्रशासनाला आणि कृषी विभागाला अशा सूचना केल्या आहेत की, अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करण्यात येऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी. अगोदरच कोरोनाच्या संसर्गाने हैराण असलेल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या खरीप हक्काचा घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला गेला आहे. अतिवृष्टी सोबतच काही औंढा नागनाथ तालुक्यात ढगफुटी चे प्रकार घडून आले आले असून यामुळे एकाच शेतजमिनीवरच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही वसमत तालुक्यातील चोंढी भागात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या रस्त्यामुळे पाणी आडुन पेरलेले पीक वाहून गेले आहे त्यामुळे अतिवृष्टी सोबतच सर्वच नुकसानग्रस्त भागाची स्थानिक कर्मचाऱ्यांना मार्फत पाहणी करण्यात यावी असे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.