चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.22ऑगस्ट) कोरोना आजाराने एकाचा मृत्यू

19

🔺जिल्ह्यात आज 6 वाजेपर्यंत 48 कोरोना बाधीत

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.22ऑगस्ट):-जिल्ह्यात आज बल्लारपूर येथील गणपती वार्डातील 79 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.त्याला कोरोना श्वसनाचे आजार होता सोबतच निमोनिया होता. त्याला 20 ऑगस्ट ला भर्ती करण्यात आले होते. त्याचा 21 ऑगस्टचा रात्री 1 वाजता अर्थात 22 ऑगस्टचा पहाटे मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज पर्यंत 1354 कोरोना बाधीत झाले असून आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 48 कोरोना बाधितांची नोंद झाली.

जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना आजारामुळे 14 मृत्यू झालेत यातील 1 तेलंगणा आणि बुलढाणा येथील एका मृत्यूचा समावेश आहे.