🔺जिल्ह्यात बाधितांची संख्या पोहोचली 1354 वर

🔺सध्या 447 बाधितांवर उपचार सुरू

🔺शनिवारी आणखी एका बाधिताचा मृत्यू

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.22ऑगस्ट:- जिल्ह्यात 24 तासात 48 बाधित पुढे आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1354 वर पोहोचली आहे. यापैकी सध्या 447 बाधितांवर उपचार सुरू आहे. तर 893 बाधित बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने अँन्टीजेन चाचणी सुरू असून लक्षणे दिसून आल्यास तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

गणपती वार्ड, बल्लारपूर येथील 79 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार व न्युमोनिया होता. बाधिताला 20 ऑगस्टला दुपारी 12.35 वाजता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. दिनांक 21 ऑगस्टच्या रात्री एक वाजता अर्थात 22 ऑगस्टच्या पहाटे मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14 बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तर तेलंगाणा आणि बुलडाणा येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

आज चंद्रपूर शहरात सर्वाधिक 19 बाधित पुढे आलेले आहे. त्याचबरोबर, बल्लारपूर येथील 5, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील प्रत्येकी दोन, कोरपना येथील 8, चिमूर, सिंदेवाही, जिवती, ब्रह्मपुरी, मुल येथील प्रत्येकी एक, गोंडपिपरी येथील 5 बाधित ठरले आहे. असे एकूण 48 बाधित पुढे आले आहे.

चंद्रपूर शहरातील पुढे आलेल्या बाधितांमध्ये बाबुपेठ परिसरातील एक, सरकार नगर येथील एक, ओम नगर भिवापूर वार्ड येथील एक, बाजार वार्ड येथील एक, रामनगर येथील एक, बाबुपेठ वार्ड पाण्याच्या टाकीजवळील परिसरातील एक, संजय नगर येथील एक, श्रीराम वार्ड रामाळा तलाव जवळील एक, तुकूम येथील चार, सुमठाणा रोड परिसरातील एक, विवेकानंद नगर वडगाव रोड येथील एक, अर्चना अपार्टमेंट परिसरातील मुल रोड चंद्रपूर येथील एक, मेजर गेट येथील एक बाधित पुढे आले आहेत. चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली व घुग्घुस येथील प्रत्येकी एक बाधित ठरले आहेत.

बल्लारपूर येथील फुलसिंग वार्ड, श्रीराम वार्ड, गुलमोहर पार्क, मौलाना आझाद वार्ड परिसरातील प्रत्येकी एक बाधित पुढे आले आहेत. राजुरा तालुक्यातील सास्ती व टेंभुरवाही येथील प्रत्येकी एक बाधित पुढे आला आहे.

कोरपना तालुक्यातील कोथोडा येथील एक तर खैरगाव येथील 7 बाधित ठरले आहेत.भद्रावती येथील एक तर तालुक्यातील माजरी येथील एक बाधित पुढे आलेला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी येथील 5 बाधित ठरले आहेत.

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED