शेतकरी शेतात गेला, वापस नाही आला – जाऊन पाहिलं तर मृत्यूने झपाटलेला

31

🔹गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील दुर्दैवी घटना

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.22ऑगस्ट):- तालुक्यातील सुपगाव येथे आज दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदराव चौधरी वय ५१ वर्षे. यांची आजची सकाळ शेवटची ठरली. आनंदराव हे ग्राम पंचायत सुपगावचे चपराशी, त्याचा सोबतच आपल्या घरची शेती करायचे. शेतात कापूस लावलेले होते. सतत आठ दिवस मुसळधार पाऊस, यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत होते. मात्र आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखा निघाला. आज पाण्याने विश्रांती घेतली.

     यामुळे सर्व शेतकऱ्यांसारखेच आनंदराव हि खूप आनंदी झाला. तेथील चर्चेप्रमाणे आनंदराव ला काही दिवसापासून ताप येत होता. मात्र ना तब्बेतीची काळजी ना स्वतःची चिंता, शेतकऱ्यांसाठी एक एक दिवस महत्वाचा, आजच्या दिवसासारखा उद्याचा दिवस मिळेल हे काही सांगता येत नाही. म्हणून आज मी माझा शेतातील कापुसाचे झाडाला फवारणी करणार. अशी आनंदरावची उत्सुकता, आनंदराव हे सकाळी उठले, खाले ना खाले करून तापाच्या गोळ्या खाले व सकाळी 7 च्या सुमारास फवारणीसाठी आपल्या शेतात गेले.

         निसर्गाने मात्र वेगळेच ठरवले होते. आनंदराव चौधरी हे फवारणीसाठी सकाळीच गेले, दुपारचे 10 वाजले तरीही परत नाही आले म्हणून घरचे जेवण घेऊन शेतात गेले. तिथे बघितल तर, आनंदराव मृत्युमुखी आढळून आला. त्यांचा मृत्यू उपाशी पोटी औषध खाल्याने झाला असावा. असा अंदाज वर्तवला जात आहे. हि माहिती कळताच घरच्यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनला कळविले. पोलीस अधिकारी मा. संदीप धोबे साहेब यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केले. आनंदराव यांना दोन मुले आहेत. अश्या अचानक घटनेने गावातील गावकर्यांमध्ये धक्का बसला असून सर्व गावात शोककळा पसरली आहे.