✒️देवराज कोळे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)
मो:- 8432409595

गेवराई(दि.22ऑगस्ट):- तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायत दिव्यांगा साठी ५ टक्के निधी आलेला असताना दिव्यांगाना निधी वाटकरत नाहीत . ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीना आदेश दिलेले आहेत. ग्रामपंचायत ने यासाठी स्वतंत्र अपंग कल्याण निधी स्थापन करावा, दिव्यांगाचा निधी वर्षेभरात खर्च झाला नाही तर शिल्लक निधी पंचायत समिती, ग्रामपंचायतिने अपंग कल्याण निधीत जमा करावा , वैक्तिक लाभाच्या योजनेतील रक्कम दिव्यांगाच्या थेट खात्यावर जमा करावी असे आदेश दिले आहेत.

ग्रामपंचायत ने दिव्यांग ५ टक्के निधी वाटप करणे बंधनकारक आहे. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना यांच्या निदर्शनास आले आहे की काही ग्रामसेवक , सरपंच दिव्यांगाची दिशाभूल करतात. व तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत ने दिव्यांग व्यक्ती चा त्यांचा हक्काचा ५ टक्के निधी वाटप केलेला नाही. कोरोनामुळे दिव्यांग बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हक्काचा निधी आहे लवकर वाटप करावा.

म्हणून प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना च्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती गेवराई येते निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की गेवराई तालुक्यातील सर्व ज्या ग्रामपंचायत ने दिव्यांग ५ टक्के स्वनिधी ३०/०९/२०२० पर्यंत वर्ग न केल्यास मा राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशावरून प्रहार संघटना यांच्या वतीने गेवराई पंचायत समिती बीडीओ कार्यालयास कुलूप लावून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नंदकुमार झाडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी उपस्थित जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र अडागळे सर बाळराजे थोरात, प्रल्हाद अडागळे, महेश झाडे ,लखन कासार, रमेश राठोड, जलींदर कासार , शाम अडागळे, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED