पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची गणेशाला प्रार्थना

    39

    🔹तुमच्या आगमनाने सर्वांना सुख समाधान परत मिळू दे !

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.23ऑगस्ट):-सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथील निवासस्थानी सपत्नीक गणेशाची प्रतिष्ठापना केली. “हे गणपती बाप्पा, तुम्ही सुखकर्ता आहात, दुःखहर्ता आहात, विघ्नहर्ता आहात. यंदाचे तुमचे आगमन संपूर्ण जगावरील कोरोनाच्या महामारीचे निर्मूलन करणारे ठरो आणि तुमच्या भक्तजनांच्या आयुष्यातले हरवलेले सुख-समाधान परत आणणारे ठरो” या शब्दात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सर्वांच्या आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना केली.