खासदार हेमंत पाटील यांनी घेतले चिंतामणी गणपती मंदिर हिंगोली येथील घेतले दर्शन

84

✒️शेख आवेज(सेनगाव,तालुका प्रतिनिधी)
मो:-8308862587

हिंगोली: कोरोना संकटामुळे यंदा नवसाला पावणारा व मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिंतामणी गणपती मंदिर येथे जाऊन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते पूजा झाली, जगावर असलेले हे भयानक टळून परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, बळीराजाची चांगली सुगी येऊ दे, अशी प्रार्थना केल्याचे ते म्हणाले. यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी रमाकांत मिस्कीन, सचिव दिलीप बांगर उपस्थित होते. सकाळी भाविकांच्या उपस्थितीत गणेश स्थापना करण्यात आली. भाविकांना मंदिरात दर्शनासाठी गर्दी करु नये यासाठी परिसरात बांबूंचे बॅरिकेट्स देखील लावण्यात आले. कोरोनामुळे मंदिर संस्थान कडून या वर्षी अनंत चतुर्थी चा होणारा वार्षिक उत्सव रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले.