मिसेस झेड.एन.एम. फॅशन आयकॉन २०२० चा निकाल जाहीर

17

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.23ऑगस्ट):- मराठवाड्याच्या ईतिहासात प्रथमच काहीतरी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची चर्चा होत आहे. ती म्हणजे झुंजार नारी मंचच्या सचिव सौ.आशा वरपे यांच्या संकल्पनेतुन आयोजित झेड.एन.एम फॅशन आयकॉन या ऑनलाईन सौदर्य स्पर्धेची.
बीडसारख्या मागास जिल्ह्यात ही काहीतरी वेगळे घडते हेही महत्वाचे, विशेष म्हनजे महिलावर्गात.
बीड मध्ये तीन वर्षापुर्वी झुंजार नारी मंचची स्थापना करण्यात आली. जिल्हाभरात महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जसे मोफत प्रशिक्षण वर्ग, करमणुकीचे कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा घेतल्या पण आज सुरु असलेल्या लॉकडाऊन मधेही महिलांना काहीतरी उपक्रम घेण्याच्यानिमित्त मागील महिन्यापासुन झुंजार नारी मंच मुली व महिलांसाठी ऑनलाईन झेड.एम.एन.फॅशन आयकॉन ही सौंदर्य स्पर्धा घेत आहे नुकतीच मुलींसाठीची मिस झेड.एम.एन फॅशन आयकॉन ही स्पर्धा संपन्न झाली. मुलींनीही भरभरून प्रतिसाद दिला.

यात सौ.आशा वरपे यांनी केलेली मेहनत, नियोजन व सादरीकरन याचे खुपच कौतुक झाले. आणि आता महिलांसाठी मिसेस झेड.एम.एन. फॅशन आयकॉन २०२० या ऑनलाईन स्पर्धेचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व परिक्षक म्हणून २०१७ सालच्या मिसेस युनिवर्स डिओडेड, २०१७ सालाच्या मिसेस नॉर्थ सेंटरल एशिया, २०१६ सालाच्या मिसेस इंडिया स्टाईल आयकॉन आणि २०१६ सालाच्या मिसेस पुणे अचिव्हर या पदव्या भुषवलेल्या पल्लवी कौशिक या होत्या. त्यांनी झुंजार नारी मंचच्या फेसबुक पेज वर लाईव्ह येऊन सदर स्पर्धेचा निकाल घोषीत केला. पल्लवी कौशिक यांनी सर्वच स्पर्धकांचे कौतुक केले तसेच सौ.आशा वरपे यांच्या या ऑनलाईन फॅशन आयकॉन स्पर्धेचे, त्यांच्या नियोजनाचे व सादरीकरनाचे कौतुक करत विजेत्याची नावे घोषीत केली.

मिसेस झेड.एन.एम. फॅशन आयकॉन २०२० या स्पर्धेत विजेत्या म्हणुन सौ.मोना लोंढे या मानकरी ठरल्या तर फस्ट रनरअप सौ.सोनाली शहाणे व सेकंट रनरअप सौ.वनिता नांदेवलीकर यांना घोषीत करण्यात आले. विजेत्यांना क्राऊन व शॅश देऊन सन्मानीत करण्यात आले.
सर्व विजेत्याचे व स्पर्धकांचे झुंजार नारी मंचच्या सचिव सौ.आशा वरपे यांनी अभिनंदन केले आहे.