✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:- 9075913114

गेवराई(दि.23ऑगस्ट):-आपणास घरकुल मंजूर झाले आहे, त्यासाठी असे पत्र लागते ते आम्ही मिळवून देऊ असे सांगून काही राजकीय बगलबच्चे लोकांची फसवणूक करत आहेत अश्या बदमाश लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे, याबाबत आपण तात्काळ कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.बीड जिल्ह्यामध्ये मार्च २०१९ मध्ये दाखल प्रस्तावांची संख्या लक्षात घेता बीड जिल्ह्यासाठी ७१८८ रमाई घरकुल प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यापैकी बीड तालुक्यातील १४९२ रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आलेली आहे, ही निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे व चौकसपणे झाल्यामुळे समाजातील गरिबातील गरीब व योग्य गरजूंना याचा लाभ मिळाला आहे परंतु हे १४९२ घरकुले समाज कल्याण विभागामार्फत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील प्रक्रिया ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामसेवकांनी करावयाचे आहे.

परंतु बीड मतदार संघाच्या स्थानिक काही लोक मागील गटविकास अधिकारी यांच्या खोट्या सहीने पत्र तयार करून त्यावर यादीतील लाभार्थ्यांची नावे हाताने टाकून सर्वसामान्य माणसाची फसवणूक करत आहेत व या पत्राची गरज आहे, असे भासवून लोकांकडून पैसे उकळत आहेत हे थांबवावी व या दोषींवर योग्य शासन करावी, तसेच देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या महामारी मध्ये प्रशासनाच्या आर्थिक तरतुदी नुसार या मंजूर झालेल्या घरकुलाचे कामे पूर्ण करावीत व बीड नगर परिषद अंतर्गत असणाऱ्या सर्व दिव्यांगणा विनाअट घरकुल योजनेचा लाभ मिळावा तसेच नवीन आराखडा किंवा नवीन प्रस्तावांना कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही स्वरूपाची मान्यता देताना पात्र लाभार्थी सोडून बगलबच्चे सांभाळण्याचा गोरज धंदा बंद करू नये सत्तेच्या चाव्या अडवा अडवित न वापरता खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेला वेठीस धरणे बंद करा नसता रयत शेतकरी संघटनेच्या वतीने बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड नगर परिषद समोर व बीड पंचायत समोर ढोल वाजून आंदोलन करण्यात येईल असा इशारा बीड जिल्हा सचिव रयत शेतकरी संघटना प्रमोद डोंगरे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED