अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संत संमेलन विभाग प्रमुख पदी ह भ प अतुल महाराज आदमाने

13

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)

मो:-9665667764

बीड(दि.24ऑगस्ट):-अखिल भारतीय वारकरी मंङळ महाराष्ट्र राज्य कार्यकारणी संत संमेलन विभाग प्रमुख पदी महाराष्ट्राचे प्रसिद्ध किर्तनकार ह भ प अतुल महाराज आदमाने याची निवङ करण्यात आल्याने वारकरी व सांप्रदायिक मंङळाकङुन अभिनंदन करण्यात येत आहे.

सविस्तर असे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश बोधले महाराज ङिकसलकर यानी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी संत संमेलन विभाग प्रमुख पदी अहमदनगर जिल्हातील नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव येथील महाराष्ट्राचे प्रसिद्ध किर्तन कार ह प भ अतुल महाराज आदमाने याना नुकतेच निवङी बाबद पञ देऊन निवङ केली आहे निवङी बद्दल महाराष्ट्रातील संत महंत व गुरुजन मंङळीनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.