लॉकडाऊन आणि माझी शाळा – माझे उपक्रम

79

कोरोनाकाळामध्ये आज सगळीकडे लोक त्रस्त आहेत .घराबाहेरबपडायला भीती वाटत बाहे.आजच्या या भयावह स्थितीत सर्वच मनातून हादरून गेलेली आपण बघत आहोत.अश्या काळात शाळा बंद आणि मुलेही घरी आहेत .मार्च पासून आजपर्यंत मुले घरीच आहेत.नेमकं काय करावे आणि मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी शासन आपल्या स्तरावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. शाळा बंद पण शिक्षण सुरू ,रेडिओ, टिलिमिली कार्यक्रम या साऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठा प्रशासनाकडून होत आहेत मुले घरीच असल्यामुळे त्यांचे शिक्षण कसे सुरू राहील यासाठी अनेक तंत्रस्नेही शिक्षकांनी विविध व्हिडिओस,व अभ्यास कार्य क्रम सुरू केले आहेत.
https://youtu.be/dRgA3-Qz5I8

मुलांना शिकण्यासाठी नानाविध कार्यक्रम सुरू असलेले तारी काही मर्यादा येत आहेत,मुलांजवळ स्मार्टफोन नाही,नेटवर्क समस्या,टि व्ही नाही यामुळे काही अंशी त्यांच्या मर्यादा येत आहे.
माझी शाळा ही दुर्गम आणि ग्रामीण भगत आहे.चार पाडे मिळून तयार झालेल्या निंबा गावाची शाळा, आज शाळा बंद आहे पण शिक्षण अव्याहत सुरू आहे,यासाठी विवीध उपाययोजना करण्यात आली.
मी माझे youtoube chanel तयार केला Educational creative activity, यात विविध विषयाचे व्हिडिओस अपलोड करून त्याची लिंक पालकांना पाठवितो . म्हणजे ज्या पालकांकडे स्मार्टफोन आहे त्यांना तो भाग व्हिडिओद्वारे समजण्यास सोपे होते. साधे मोबाईल असणाऱ्या मेसेजेस आणि फोन करून समजून देने अभ्यास पुरविणे, यासारखी कामे सुरू आहेत. गृहभेटी घेऊन सुरक्षतेची सर्व काळजी घेत विद्यार्थ्यांना शिकविणे सुरू आहे.

https://youtu.be/IoHss8IRhII
विविध प्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन सुरू आहेत जसे नुकतेच डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम ऑनलाईन साजरा करण्यात आला. कविता ,गाणी,भाषणे मुलांनी विडिओ करून पाठवली पालकांना विशेष आभार त्यांनी या भिषण काळात आव्हान स्विकारून मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतः तयारी करून घेतली. विद्यार्थी होमवर्क करून फोटो ग्रुपवर टाकतात ती तपासून सुधारणा करून सांगितले जाते.
निबंध स्पर्धा,विद्यार्थी उपक्रम ,कलाकुसर आणि विविध प्रकारच्या कला मुलांमध्ये चुरस निर्माण होते यासाठी मुलं मोबाईल ची मदत घेतात आणि विविध विषय शोधून काढतात. उपक्रमशिल शिक्षक राजेन्द्र बन्सोड सरांनी आपले अध्यापनाचा विवीध व्हिडिओ बनवून ग्रुपवर पाठवून मुलांचा अभ्यास चालू ठेवले आहे. शिवाय प्रथम अँप द्वारे प्रसारित कार्यक्रम पोचविण्याचे काम करीत मुलांचा अभ्यास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
घरी जाऊन मुलांचा गृहकार्य,विषय घटक समजावून देण्याचे काम करीत आहेत.
https://youtu.be/AHZlvO2sKvQ

या लिंक वर जाऊन आपण मुलांचा onloine घेतलेला कार्यक्रम पाहू शकतो.

✒️राजेन्द्र धर्मदास बन्सोड
स.शिक्षक
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा
पंचायत समिती गोरेगाव ,जिल्हा परिषद गोंदिया
मो:-8275290252