प्रती हेक्टर साठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी – तहसीलदार यांना दिले निवेदन

    43

    ?खानगाव शेत शिवारातील सोयाबीन पिकावर लष्करी अळी

    ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर(दि.24ऑगस्ट):- तालुक्यातील खानगाव शेत शिवारात नुकताच झालेल्या सतत पावसा मुळे सोयाबीन शेत पिकाचे नुकसान झाले असून त्या पिकावर लष्करी अळी चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे याची दखल कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक तथा खानगाव चे सरपंच एकनाथ धोटे यांचे नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रती हेक्टर साठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनातून केलेली आहे.

    आगस्ट महिन्यात सतत पावसामुळे खानगाव शेत शिवारातील सोयाबीन पीकावर लष्करी अळी चा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोयाबीन पीक होणार नाही सोयाबीन पिकाला देठ फांद्या व पानेच शिल्लक राहिलेले दिसत असून शेंगा मात्र लागल्याचं नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही सोयाबीन ची रीतसर मशागत करण्यात आली परंतु सतत पाऊस व ढगाळ वातावरण मुळे अळ्या निर्माण होत अळीने शेंगा खाऊन टाकल्या खानगाव सावरी माकोना गुजगव्हान या शेत शिवारातील सोयाबीन लष्करी अळी चा प्रादुर्भाव वाढलेला आहे शासनाने स्थळ पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टर साठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा खानगाव चे सरपंच एकनाथ धोटे यांनी केली असून त्यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी हेमराज महाकुलकर राजेंद्र रामटेके नथु भलावे अभिजित डाहूले मारोती सोयाम पुरुषोत्तम आवारी वामन उईके उपस्थित होते.